शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

ईटीसी केंद्रांच्या व्यवहाराची होणार चौकशी

By admin | Published: April 09, 2017 2:53 AM

महापालिकेच्या वाशी येथील ईटीसी अपंग प्रशिक्षण (दिव्यांग) केंद्रातील कथित गैरकारभाराची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच केंद्राच्या संचालकपदाच्या

नवी मुंबई : महापालिकेच्या वाशी येथील ईटीसी अपंग प्रशिक्षण (दिव्यांग) केंद्रातील कथित गैरकारभाराची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच केंद्राच्या संचालकपदाच्या नियुक्तीबाबतही सखोल पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा आशयाची घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली आहे. त्यामुळे येत्या काळात ईटीसी केंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दिव्यांग मुलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून वाशी येथे ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण सेवा केंद्र चालविण्यात येत आहे; परंतु मागील काही काळापासून विविध कारणांमुळे हे केंद्र वादग्रस्त ठरले आहे. तसेच केंद्राच्या संचालिका वर्षा भगत यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या केंद्राच्या एकूण कारभारावरून महापालिकेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली होती. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या केंद्राच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तर खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत या केंद्राची पाहणी करून कारभार पारदर्शक असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपात दरी वाढली होती. असे असतानाही आमदार मंदा म्हात्रे यांनी या केंद्राच्या कारभाराची चौकशी व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून या केंद्राच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी ईटीसी केंद्राच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच केंद्राच्या संचालकपदाची नियुक्ती वैध आहे की नाही, याचीही माहिती घेऊन आवश्यकतेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)