१.५ कोटी कस्टम ड्युटी बुडवून आयात केलेले ९५ लाख किमतीचे इथेनॉल शुल्क विभागाकडून जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:31 PM2023-09-07T19:31:58+5:302023-09-07T19:32:16+5:30
५८ हजार लिटर्सचा साठा जप्त
मधुकर ठाकूर
उरण : ड्युटी बुडवून आयात केलेले दीड कोटी किमतीचे इथेनॉल न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाकडून जप्त करण्यात आले आहे.मुंबई कस्टम झोन ३ च्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कारवाई केली आहे.
सोलापूर येथील हेमंत ट्रेडिंग कंपनीने ५८ हजार लीटर इथेनॉल प्रदेशातुन मागविण्यात आले होते. कंपनीने हे इथेनॉल रसायन प्रयोगशाळेच्या वापरासाठी असल्याचे चुकीचे घोषित करण्यात आले होते.या इथेनॉल रसायनावर सीमा शुल्क विभागाकडून १५० टक्के शुल्काची आकारणी करते.मात्र रासायनिक आणि फार्मास्युटिकल कंपन्या अल्कोहोल कच्चा माल म्हणून कमी शुल्कात आयात करू शकतात.मात्र कंपनीने आयात करण्यात आलेले इथेनॉल प्रयोगशाळेच्या वापरासाठी असल्याचे चुकीचे घोषित केले . तसेच सीमा शुल्क विभागाची दिशाभूल करीत फक्त १० टक्के शुल्क भरुन हे इथेनॉल न्हावा
-शेवा बंदर उतरवून घेतले.
अशा संशयास्पद आयातीची मुंबई कस्टम झोन ३ च्या अधिकाऱ्यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी कारवाई करीत दीड कोटी किमतीचे ५८ हजार लिटर्स इथेनॉल जप्त करण्यात आले.या हेमंत ट्रेडिंग कंपनीने याआधीही मागील पाच वर्षात अनेक वेळा फसवणूक करून सीमा शुल्क विभागाची दिशाभूल करीत कोट्यावधींची ड्युटी बुडवून इथेनॉल युकेतुन आयात केलेले असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत.यासाठी कंपनीला नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.मात्र त्याकडे कंपनीने कानाडोळाच केला आहे.मंगळवारी पकडलेल्या खेपाव्यतिरिक्त युकेमधुन कंपनीने ऑर्डर केलेले अल्कोहोलचे आणखी दोन कंटेनर आयात करण्यात येणार आहेत.हे दोन्ही कंटेनरही जप्त केले जाणार असल्याचे माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.