येथील जेएनपीटी बंदरातील तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने केलेल्या दोन तपासणी मोहिमेत तीन कोटींच्या ३२ मेट्रिन टन नेकट्रराईनसह मंगळवारी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कंटेनरमधून झेब्रा प्राण्याच्या कातड्यासह अघोषित मौल्यवान कलाकृती आणि लॅरी नॉर्टन, लॅम्बार्टसारख्या प्रमुख चित्रकारांची ३८ दुर्मीळ चित्रे जप्त केली आहेत.
एका दिवसापूर्वी इराणीयन किवी फळांच्या १७७ मेट्रिन टनाच्या कंटेनरच्या तपासणीत तीन कोटी रुपये मूल्याचे ३२ मेट्रिन टन नेकट्रराईन आढळले होते, तर मंगळवारी गुप्त माहितीनंतर घरगुती वस्तूंच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेतून मागविलेल्या कंटेनरची तपासणी करण्यात आली.
३८ चित्रे लॅरी नॉर्टन, लॅम्बार्ट यांची, ३२ मेट्रिन टन नेकट्रराईनही जप्त
झेब्रा प्राण्याच्या कातड्यासह मौल्यवान कलाकृती आणि लॅरी नॉर्टन, लॅम्बार्टसारख्या प्रमुख चित्रकारांची ३८ दुर्मीळ चित्रे जप्त केल्याची माहिती न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने दिली,