सामाजिक शांततेसाठी प्रत्येकाचे योगदान हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:44 AM2018-08-29T04:44:59+5:302018-08-29T04:45:46+5:30

शहरवासीयांना आवाहन : पोलिसांच्या वतीने वाशीत समन्वय सभेचे आयोजन

Everyone needs to be involved in social peace | सामाजिक शांततेसाठी प्रत्येकाचे योगदान हवे

सामाजिक शांततेसाठी प्रत्येकाचे योगदान हवे

googlenewsNext

नवी मुंबई : सामाजिक शांतता राखणे, ही सर्व नागरिकांची जबाबदारी असून त्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांनी व मान्यवरांनी केले आहे. नागरिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी वाशीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबईमध्ये सामाजिक सलोखा कायम राखावा, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याचाच भाग म्हणून अभिनेते नाना पाटेकर यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली. प्रमुख व्याख्याते गणेश शिंदे म्हणाले की, समाज व्यवस्था काही तरी अपेक्षा करणे, ते पेलवण्याची आणि करण्याची आज खरी गरज आहे. माणसे जोडता आली तरच महासत्ता निर्माण होईल. सोशल मीडियावरून आलेल्या आक्षेपार्ह मेसेजमुळे अफवांचे पेव वाढते. भाजपा युवानेते वैभव नाईक यांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. कोपरखैरणे येथील गंगाई मित्रमंडळ आणि ऐरोलीमधील तरु ण मित्रमंडळ यांनी आपले उत्सव रद्द केले आहेत. या दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. आमदार शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांनीही नवी मुंबईमध्ये सामाजिक ऐक्य कायम राखण्यासाठी व शांतता भंग होणार नाही, यासाठी पोलिसांनी चांगला उपक्रम राबविला आहे. प्रत्येक नागरिकाने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. मराठा आंदोलनादरम्यान नवी मुंबईमध्ये दोन गटांमध्ये तेढ निर्माण झाली होती. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी ही सभा आयोजित केली होती. मराठा समन्वय समितीचे अंकुश कदम आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली व ९ आॅगस्टच्या बंदमध्ये सहभागी न होऊन पोलिसांना सहकार्य केल्याचे सांगितले. रामचंद्र घरत यांनी नवी मुंबईमधील नागरिक सर्व सण, उत्सव एकत्र साजरे करत असल्याची भूमिका मांडली. पोलिसांनी मोहल्ला कमिटीसारखे उपक्रम राबवावे, असे मत माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी व्यक्त केले. या वेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे उपस्थित होते.
 

Web Title: Everyone needs to be involved in social peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.