नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या आजी - माजी नगरसेवकांमध्ये महापालिका मुख्यालयामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. माजी महापौरांच्या समोरच ही घटना घडली. याविषयी दोघांनी एकमेकांविरोधात एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.सीवूड सेक्टर ४६ ए मधील मैदानामध्ये जॉगिंग ट्रॅक बनविण्याचा प्रस्ताव नगरसेवक गणेश म्हात्रे यांनी सभागृहात मंजूर करून घेतला आहे. या मैदानामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ नये यासाठीही अशासकीय ठराव मंजूर करण्यात आला आहे. याच मैदानामध्ये माजी नगरसेवक भरत जाधव नवरात्री उत्सवाचा कार्यक्रम करत असतात. त्यांना महापालिकेने या वर्षी परवानगी नाकारली आहे. यामुळे जाधव हे अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी बुधवारी महापालिका मुख्यालयात गेले होते. त्या वेळी त्यांची व गणेश म्हात्रे यांची समोरासमोर भेट झाली. मैदानाच्या विषयावरून दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.माजी महापौर सागर नाईक, रवींद्र इथापे, संदीप सुतार, विनोद म्हात्रे व इतर पदाधिकाऱ्यांच्या समोर हा प्रकार घडला. या घटनेनंतर नगरसेवक गणेश म्हात्रे यांनी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये भरत जाधव यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. जाधव यांनीही म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले व पूर्वीचे भाजप पदाधिकाºयांमधील हा पहिला संघर्ष आहे.>नागरिकांच्या मागणीवरून मैदानाभोवती जॉगिंग ट्रॅक तयार करणे व ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी कार्यक्रमांना बंदी करण्याचा ठराव मंजूर केला आहे. यावरून भरत जाधव यांनी मुख्यालयात मला अपशब्द वापरले. याविषयी रीतसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.- गणेश म्हात्रे,नगरसेवक प्रभाग १११>सीवूडच्या मैदानामध्ये आम्ही नवरात्र उत्सव करत असतो. नगरसेवकांच्या ठरावामुळे प्रशासनाने परवानगी नाकारली. याविषयी विचारणा केल्यामुळे किरकोळ शाब्दिक वाद झाला. याविषयी आम्हीही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.- भरत जाधव,माजी नगरसेवक
आजी-माजी नगरसेवकांमध्ये भांडण, मनपा मुख्यालयात घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:01 AM