शाळेसाठी पारसिक टेकडीचे खोदकाम; पर्यावरणप्रेमी नाराज, मुख्यमंत्र्यांना पत्र

By नारायण जाधव | Published: January 9, 2024 12:44 PM2024-01-09T12:44:36+5:302024-01-09T12:45:25+5:30

प्लॉट टेकडीच्या पायथ्याशी आहे आणि यंत्रांनी टेकडीचे काही भाग कापण्यास सुरुवात केली आहे.

excavation of parsik hill for school environmentalists upset letter to cm | शाळेसाठी पारसिक टेकडीचे खोदकाम; पर्यावरणप्रेमी नाराज, मुख्यमंत्र्यांना पत्र

शाळेसाठी पारसिक टेकडीचे खोदकाम; पर्यावरणप्रेमी नाराज, मुख्यमंत्र्यांना पत्र

नवी मुंबई: पारसिक टेकडीला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला असून, शाळेच्या भूखंडाच्या विकासाचा एक भाग म्हणून टेकडीच्या पायथा अवाढव्य मशिनद्वारे कापला जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल पाठवून नॅटकनेक्ट फाऊंडेशन आणि पासिक ग्रीन्स फोरम  म्हणाले की, CBD बेलापूरच्या सेक्टर 30/31 येथील टेकडीची पूर्व बाजू “धोकादायकपणे कापली जात आहे”. सिडकोने श्री ज्ञानेश्वर माऊली संस्थेला शाळेच्या प्रकल्पासाठी ४,१३९ चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. नॅटकनेक्‍टचे संचालक बी एन कुमार म्हणाले की शाळेला कोणताही आक्षेप नाही, परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की प्लॉट टेकडीच्या पायथ्याशी आहे आणि यंत्रांनी टेकडीचे काही भाग कापण्यास सुरुवात केली आहे.

सिडकोने टेकडीचा कोणताही भाग कापल्यास पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत संवेदनशील असले पाहिजे, असे कुमार म्हणाले. यापूर्वी सुशोभीकरणाच्या नावाखाली मधूनच टेकडी कापण्यावर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.  महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आणि सिडकोला संबंधित बिल्डरवर कारवाई करावी लागली. तरीही, आता त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होत आहे, तीही अक्षरशः सिडकोच्या नाकाखाली, पारसिक ग्रीन्सचे विष्णू जोशी म्हणाले. 

शाळेच्या प्लॉटच्या टेकडीवर अधिकृत खुणा त्यांच्या लक्षात आल्याचे जोशी यांनी सांगितले. टेकडीवर 100 हून अधिक व्यापलेल्या इमारती उभ्या आहेत आणि टेकडी कापली गेल्यास त्यांना जोखीम उत्पन्न होण्याची शक्यता आहे, असे मंचाचे आणखी एक सदस्य आणि पारसिक हिल्स रहिवासी संघटनेचे अध्यक्ष जयंत ठाकूर म्हणाले. कार्यकर्ते सुधीर दाणी यांनीही सिडको डोंगराच्या सुरक्षेची काळजी घेत नसल्याची खंत व्यक्त केली. 2022 च्या पावसाळ्यात टेकडीवर दरड कोसळून पाणीपुरवठा देखरेख केंद्राचे नुकसान झाल्याची घटनेची आठवण कार्यकर्त्यांनी करून सांगितले.

Web Title: excavation of parsik hill for school environmentalists upset letter to cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा