वसाहत विभागातील सेवांचे सुलभीकरण, सिडकोचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 12:54 AM2019-06-30T00:54:21+5:302019-06-30T00:54:40+5:30
विशेष म्हणजे, त्यासाठी विविध प्रकारची अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. मात्र, नागरिकांचा हा त्रास कमी होणार आहे.
नवी मुंबई : सिडकोतील वसाहत हा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी संबंधित अनेक कामांसाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. विशेष म्हणजे, त्यासाठी विविध प्रकारची अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. मात्र, नागरिकांचा हा त्रास कमी होणार आहे. कारण सिडको व्यवस्थापनाने या सेवांचे सुलभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध सेवांसाठी सादर कराव्या लागणाºया कागदपत्रांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. येत्या १ जुलैपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे.
मालमत्ता हस्तांतर किंवा तारण यासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे, कायदेशीर वारस हस्तांतर, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र (नो ड्यू सर्टिफिकेट) आदीसाठी नागरिकांना सिडकोच्या वसाहत विभागात फेºया माराव्या लागतात. त्यासाठी विविध प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामुळे नागरिकांची दमछाक होते. यासंदर्भात वाढत्या तक्रारीची दखल घेऊन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या सेवांसाठी लागणाºया कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे कमी करणे शक्य आहे, याचा अभ्यास करण्यासाठी एक कृती समिती गठित केली होती. या समितीने हस्तांतर/तारण, ना हरकत प्रमाणपत्र आणि वारस हस्तांतर सेवांसाठी सुचविलेल्या सुधारित प्रक्रियेला लोकेश चंद्र यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार १ जुलैपासून या नवीन प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. नवीन प्रणालीनुसार सदनिकांचे हस्तांतर किंवा तारणाकरिता ना हरकत प्रमाणपत्र देणे किं वा हस्तांतर यासाठी अर्जदाराला आता केवळ गृहनिर्माण संस्थेचे ना हरकत आणि थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन असणार आहे. शुल्कही आॅनलाइन स्वीकारले जाणार आहे. संबंधित अर्जदाराला त्याच्या ई-मेलवर मागणीनुसार ना हरकत प्रमाणपत्र पाठविले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे प्रत्यक्ष कार्यालयात फेºया मारण्याची आवश्यकता भासणार नाही. वसाहत विभागाच्या या सेवा लवकरच प्रत्येक नोडमधील कार्यालयात सुरू करण्यात येणार आहेत.
वसाहत विभागाशी संबंधित प्रक्रिया आता सुलभ झाल्याने नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार सिडको कार्यालयात फेºया माराव्या लागणार नाहीत, तसेच आवश्यक सेवा जलदगतीने मिळणार असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.
-लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको