नवी मुंबई : शासनाने लागू केलेल्या टोल दरवाढीतून नवी मुंबईतील वाहनांना वगळण्यात यावे. टोल दरवाढ तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. याविषयी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.नवी मुंबईमधून मुंबईमध्ये जाण्यासाठी वाशी व ऐरोलीजवळ टोल नाका आहे. शासनाने नुकतीच टोल दरवाढीमध्ये वाढ केली असून, त्याचा फटका नवी मुंबईमधील नागरिकांनाही बसू लागला आहे. शहरातील नागरिकांना नोकरी, व्यवसायासाठी मुंबईत जावे लागते.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरवासीयांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. लोकल सुरू नसल्यामुळे व बस सेवा अपुरी असल्याने नवी मुंबईमधील नागरिक स्वत:ची गाडी घेऊनच कामाच्या ठिकाणीही जात आहेत. टोल दरवाढीचा फटका सर्वांना बसण्याची शक्यता आहे.टोल दरवाढ तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. याविषयी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठविण्यात आले आहे.नागरिकांमध्ये दरवाढीविषयी असंतोष आहे.शासनाने दरवाढ कमी करून दिलासा दिला नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
"टोल दरवाढीतून नवी मुंबईला वगळा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 12:18 AM