उद्योग संजीवनी योजनेस मुदतवाढ
By admin | Published: September 13, 2016 02:48 AM2016-09-13T02:48:46+5:302016-09-13T02:48:46+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उद्योग संजीवनी योजनेस ३१ आॅॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
अलिबाग : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उद्योग संजीवनी योजनेस ३१ आॅॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यासाठी सर्व संबधितांनी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी केले आहे.
या योजनांमध्ये जे भुखंडधारक भाग घेऊ शकले नाहीत अशा औद्योगिक भुखंडधारकांना एक शेवटची संधी म्हणून या योजनेचा कालावधी ३१ आॅगस्ट २०१७ पर्यत वाढवून देण्यात येत आहे. तसेच ही योजना निवासी व व्यापारी भुखंडांना सुध्दा लागू करण्यात येत आहे. ज्या औद्योगिक, व्यापारी व निवासी भुखंडधारकास या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे अशा भुखंडधारकास मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करणे, मुदतवाढीकरिता नापरतीची अतिरिक्त रक्कम अदा करणे तसेच विहित नमुन्यातील पुरक करारनामा कार्यान्वित करण्यास ३१ आॅक्टोबर २०१६ पर्यत मुदत दिली असल्याचे क्षिरसागर यांनी सांगितले.
उद्योग संजीवनी योजनेमध्ये सहभागी औद्योगिक भुखंडधारकांना ३१ आॅगस्ट २०१७ पर्यत विनाशुल्क राहील. निवासी व व्यापारी भुखंडधारकांना ना परतीची अतिरिक्त रक्कम वसूल करु न ३१ आॅगस्ट २०१७ पर्यत मुदतवाढ मंजूर करण्यात येईल. अशा औद्योगिक व्यापारी व निवासी भुखंडधारकास ३१ आॅगस्ट २०१७ पर्यत इमारत पुर्णत्वाचा दाखला प्राप्त करु न उत्पादन, व्यवसाय सुरु करणे बंधनकारक करण्यात येत आहे. या योजना ज्या भुखंडांचा विकास कालावधी ३१ आॅगस्ट २०१३ पूर्वी संपुष्टात आलेला आहे अशा औद्योगिक, निवासी व व्यापारी भूखंडासाठीच लागू आहे.