शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

करंजा-रेवस मार्गावरील जलप्रवास महागला, प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 4:14 AM

देशातील जलमार्गांचा झपाट्याने विकास करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात जलप्रवासाचे जाळे जोडण्याचा सरकारने संकल्प केला आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : देशातील जलमार्गांचा झपाट्याने विकास करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात जलप्रवासाचे जाळे जोडण्याचा सरकारने संकल्प केला आहे. प्रवासाच्या इतर साधनांच्या तुलनेत जलप्रवास किफायतशीर असतो; परंतु करंजा (उरण)-रेवस (अलिबाग) जलप्रवासाच्या तिकिटामध्ये वाढ करण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. अन्यायकारक केलेली दरवाढ रद्द करण्याची मागणी आॅल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशने केली आहे.परिवहन व बंदर विभागाचे प्रधान सचिव मनोज सैनिक यांना याबाबतचे निवेदन आॅल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिले.अलिबाग हे मुंबईच्या जवळचे शहर आहे. अलिबाग तालुक्यामध्ये दळण-वळणाच्या पुरेशा सुविधा अद्यापही मूर्तरूप घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उपलब्ध असलेला रस्त्यांवरील प्रवास हा खर्चिक आणि वेळ खाणारा आहे. अलिबाग तालुक्यातून मोठ्या संख्येने चाकरमानी, तसेच व्यापारी मुंबईमध्ये विविध कारणांनी प्रवास करतात. यामध्ये दिवसागणिक वाढच होत असल्याचे दिसून येते. चाकरमानी आणि व्यापारी जलप्रवासाला सर्वाधिक पसंती देतात. अलिबागमध्ये अलिबाग (मांडवा)-मुंबई (गेटवे आॅफ इंडिया) आणि अलिबाग (रेवस)-मुंबई (भाऊचा धक्का) आणि उरण तालुक्यातील करंजा-रेवस ही जलप्रवासाचे प्रमुख मार्ग आहेत. मांडवा-मुंबई हा जलप्रवास गेल्या काही वर्षांपासून महागडा ठरत आहे. त्यामुळे चाकरमानी विशेष करून छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, फेरीवाले रेवस-करंजा या जलप्रवासाला पसंती देताना दिसून येतात.करंजामधून मुंबईमध्ये कमीत कमी खर्चात जाता येत असल्याने या मार्गाला जास्त प्रसंती आहे. दरवर्षी येथून सुमारे चार लाख प्रवासी प्रवास करतात. व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक यांची वार्षिक उलाढाल ही करोडो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या बंदराचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व वाढत असल्याचे दिसून येते.करंजा-रेवस जलप्रवासाचे तिकिटांचे दर तब्बल २० रु पये करण्यात आले आहे. फक्त सव्वा किलोमीटरच्या प्रवासासाठी २० रुपये आकारणे, अन्यायकारक आहे. याआधी १३ रु पये तिकिटांचे दर होते. तेही अधिकच होते. त्यातच आता थेट २० रु पये वाढ करून त्यांनी प्रवाशांच्या खिशाला चांगलीच चाट दिली आहे. प्रवाशांवर लादलेली ही अन्यायकारक दरवाढ तातडीने रद्द झाली पाहिजे, अशी मागणी आॅल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्राकांत मोकल यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.रेवस-मुंबई जलवाहतूक सध्या बंद आहे. त्यामुळे करंजा-रेवस, मोरा-मुंबई येथील जलप्रवासावर चांगलाच ताण पडत असल्याचे मोकल यांनी स्पष्ट केले. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले असतानाही तिकिटांच्या दरामध्ये वाढ का करण्यात आली? असा सवालही त्यांनी केला. अन्यायकारक केलेली दरवाढ तातडीन रद्द करण्यात यावी. ही मागणी आॅल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनने परिवहन व बंदर विभागाचे प्रधान सचिव मनोज सैनिक यांच्याकडे केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.