- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे शालेय गणवेश वाटप करण्यास दिरंगाई झाली आहे. त्याचा आर्थिक फटका महापालिकेला बसला असून शैक्षणिक वर्ष संपताना विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशामुळे आठवी इयत्तेमधून नववीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे वाया गेले आहेत.महापालिका शाळेत शिकणाºया प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, मौजे यासारखे शालेय साहित्य, गणवेश देण्यात येत होते. तसेच पूरक पोषण आहार, मध्यान्ह भोजन यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.महापालिका शाळेतील सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे राज्यातील इतर महापालिका शाळांपेक्षा नवी मुंबई पालिका शाळेमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचा पट देखील दरवर्षी वाढत आहे. शैक्षणिक वर्ष २0१६ -१७ साली राज्य सरकारने डीबीटी धोरण लागू केले होते. परंतु राज्यातील विविध शाळांचे गणवेश बाजारात उपलब्ध होत नसल्यामुळे या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना येणाºया अडचणी लक्षात घेता डीबीटी धोरणातून गेल्यावर्षी गणवेश वगळण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी सुमारे दोन वर्षे गणवेशापासून वंचित राहिले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने गणवेश खरेदीचा प्रस्ताव महासभेत मंजूर करून घेतला होता त्यानंतर निविदा प्रक्रि या होऊन स्थायी समितीची देखील मंजुरी मिळविली होती; परंतु या सर्व प्रक्रियांना लागलेला विलंबामुळे शैक्षणिकवर्षा अखेर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात येतआहे.महापालिकेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी हाफपँट असून माध्यमिक विभागासाठी फूलपँट आहे. शैक्षणिक वर्ष २0१८ -१९ चे गणवेश असल्याने यामध्ये आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना देखील गणवेशाचे वाटप करण्यात येत असून हाफपँट देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना फूलपँट मिळण्यासाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव मंजुरीसाठी आणावा लागणार असून यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नववीचे शैक्षणिक वर्ष हाफ पँट वापरून पूर्ण करावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांना महापालिकेने जरी फूलपँट पुरविल्या तरी हाफपँटवर केलेला खर्च व्यर्थ जाणार आहे.>शालेय विद्यार्थ्यांच्या चिक्कीमध्ये अळीनवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार म्हणून चिक्की देण्यात येते. सदर चिक्की रबाळे येथील एका गोदामात तयार करण्यात येत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करीत चिक्की न देता अल्पोपहार देण्यात यावा, अशी मागणी अनेक वेळा स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली आहे. सदर प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चिक्की देण्याचा ठेका जुन्याच कंत्राटदाराला देण्यात आला आहे. या चिक्कीमध्ये अळी आढळल्याने चक्की पुन्हा वादाच्या भोवºयात गेली आहे.>प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहे. सदर गणवेश मागील शैक्षणिक वर्षातील असून बालवाडीपासून दहावीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांचे गणवेश एकसारखे आहेत. त्यामुळे जास्त अडचण येणार नाही. चिक्कीमध्ये सापडलेली अळी शाळेत आढळली नसून घरी नेलेल्या पाकिटात आढळली आहे. सदर चिक्कीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.- संदीप संगवे,शिक्षणाधिकारी न.मुं.म.पा.
विद्यार्थ्यांच्या गणवेशावरील खर्च व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:52 PM