तारापूरच्या कंपनीत स्फोट, ६ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:49 AM2019-01-26T04:49:12+5:302019-01-26T04:49:23+5:30

तारापूर एमआयडीसीतील ई-९३ व ९४ या प्लॉटमधील साळवी केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये शुक्रवारी पहाटे ड्रायरचा स्फोट झाला.

Explosion in Tarapur company, 6 injured | तारापूरच्या कंपनीत स्फोट, ६ जखमी

तारापूरच्या कंपनीत स्फोट, ६ जखमी

googlenewsNext

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील ई-९३ व ९४ या प्लॉटमधील साळवी केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये शुक्रवारी पहाटे ड्रायरचा स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत एक कामगार गंभीर जखमी झाले असून पाच कामगार भाजले आहेत. त्यांच्यावर बोईसर येथील खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत
या रासायनिक कारखान्यांमधील ड्रायरमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू असताना अचानक स्फोट झाला. त्यावेळी वीज गेल्याने कामगार सैरावैरा पळू लागले. त्यामध्ये अफताब आलम (२८) या कामगार जास्त भाजला. तर मोहम्मद शाह (२० ), मुमताज शाह (१९), नासिर साही (१९), अन्वर साही (१८) वसीम अक्र म (१९) हे कामगार किरकोळ भाजले. आगीच्या लोळांमध्ये काही कामगारांच्या डोक्याचे केस जळले. पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग नियंत्रणात आणली. येथे कंपनी अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देवून चौकशी सुरु केली आहे.

Web Title: Explosion in Tarapur company, 6 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.