पनवेल बसमध्ये आढळला विस्फोटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 10:34 AM2019-02-21T10:34:04+5:302019-02-21T10:34:10+5:30

पनवेलमधील आपटे बस स्थानकावरील बसमध्ये बाँब सदृश्य वस्तू आढळून आली होती.

Explosive found in Panvel bus | पनवेल बसमध्ये आढळला विस्फोटक

पनवेल बसमध्ये आढळला विस्फोटक

Next

- वैभव गायकर
पनवेल : पनवेलमधील आपटे बस स्थानकावरील बसमध्ये बाँब सदृश्य वस्तू आढळून आली होती. रात्री कर्जतवरून आपट्याला येणारी बस आपटे बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला एका पिशवीत काही तरी टाईम बाँब सारखे असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब बाँब शोधक पथकाला कळवले.

रात्री 12 वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह अलिबाग वरून बाँब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत लोकांना याची माहिती मिळाली असल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी सर्वांना बसपासूनच दूर केले होते. आलेल्या बाँब शोधक पथकाने पाहणी केली असता ती वस्तू खरोखरच बाँब असल्याचे आढळून आले. रात्री उशिरापर्यंत बाँब निकामी करण्याचे काम सुरू झाले. शेवटी रात्री साडेतीनच्या सुमारास यशस्वीरीत्या बाँब निकामी केले गेले आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

काही दिवसांपूर्वीच पुलवामा येथील दहशतवादी हल्ला झाला होता ज्यामध्ये ४४ भारतीय जवान शहीद झाले. अशातच ही घटना म्हणजे दहशतवाद्यांनी अनुचित प्रकार घडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने वेळीच याबाबत माहिती मिळाली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा फार मोठे संकट उभे राहिले असते. पोलिसांनी याबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून कोणतीही बेवारस वस्तू आढळून आल्यास हात न लावता त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Explosive found in Panvel bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.