एक्स्प्रेस वेवर पेट्रोलपंप चालकांची मनमानी

By admin | Published: May 23, 2017 02:03 AM2017-05-23T02:03:05+5:302017-05-23T02:03:05+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एचपी पेट्रोल पंपचालकाच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक व प्रवासी सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

Expressway Weapons of Petrol pump drivers | एक्स्प्रेस वेवर पेट्रोलपंप चालकांची मनमानी

एक्स्प्रेस वेवर पेट्रोलपंप चालकांची मनमानी

Next

अंकुश मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वावोशी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एचपी पेट्रोल पंपचालकाच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक व प्रवासी सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
पेट्रोलपंप आवारात मोबाइल वापरण्यास बंदी असते. याठिकाणी हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे. याकडे संबंधित विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीनजीक असणाऱ्या एचपी पेट्रोलपंप आवारातील निशीसागर हॉटेलामध्ये गॅसवर पदार्थ तयार केले जातात. पेट्रोलपंप परिसरात कुठलाही ज्वलनशील पदार्थ हाताळू नये, असा शासनाचा नियम आहे, पण या हॉटेल व्यवस्थापनाने शासकीय नियमांना हरताळ फासला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. याशिवाय जवळच आलेल्या अलांना आॅइल कंपनी, तसेच पेट्रोलपंपावर असणाऱ्या डिझेल व पेट्रोलच्या साठवण टाक्यांमुळे एखादी ठिणगी पडली तर पेट्रोलपंपासह जवळचा पूर्ण परिसर खाक होऊ शकतो.
एसटी महामंडळाने याठिकाणी थांबा दिल्याने प्रवाशांची वर्दळही वाढली आहे. पेट्रोलपंप आवारात कमी जागा असून, सुमारे ३०० च्या आसपास एसटी व खासगी बस तसेच पेट्रोलपंपावर पेट्रोल अथवा डिझेल भरण्यासाठी शेकडो वाहनांची संख्या नेहमीच दिसते. त्यामुळे कुठल्या निकषावर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी थांबा दिला, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
पेट्रोलपंप परिसरात अनेक गावे आहेत, एखादी दुर्घटना घडल्यास त्या गावांनाही झळ बसून जीवित वा वित्तहानी होऊ शकते. यासंदर्भात कोकण भवन कार्यालयातील स्फोटक नियंत्रण विभागाच्या डॉ. योगेश खरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विभागीय मुख्य कंट्रोलर अधिकारी विनोद कुमार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले, तर विनोद कुमार यांनी आपण सुटीवर असल्याचे सांगून प्रतिक्रि या देण्यास नकार दिला.

Web Title: Expressway Weapons of Petrol pump drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.