बाहेरच्या उमेदवारांना राजकीय प्राधान्य
By admin | Published: May 2, 2017 03:32 AM2017-05-02T03:32:36+5:302017-05-02T03:32:36+5:30
गेली काही वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक मंडळींभोवती फिरत असलेले पनवेलचे राजकारण महापालिका निवडणुकीच्या
अरु णकु मार मेहत्रे / कळंबोली
गेली काही वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक मंडळींभोवती फिरत असलेले पनवेलचे राजकारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक दिसून येत आहे. घाटावरील आणि कोकणातील मूळमतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांकडून बाहेरच्या उमेदवारांकडे संधी देण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखली आहे. कित्येकांना महापालिका निवडणुकीत संधी मिळाल्यात जमा आहे. काहींनी तर कामाला सुरुवातही केली आहे.
पनवेल नगरपालिकेचा गेल्या दशकभराचा अभ्यास करता, संतोष शेट्टी यांच्या व्यतिरिक्त इतर बाहेरच्या व्यक्तींना राजकारणात प्रभाव पाडता आला नाही. किंवा त्यांना संधीच दिली गेली नसल्याने उमेदवारी किंवा प्रतिनिधित्व करता आले नाही; परंतु पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्याने आता बहुसंख्येने असलेल्या मतदारांचा आदर करणे क्र मप्राप्त ठरलेले आहे. राजकीय पक्षांना बाहेरच्या उमेदवारांना संधी द्यावी लागणार आहे. घाटमाथा आणि कोकणातील सर्वाधिक लोकवस्ती कामोठे नोडमध्ये आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील लोक येथे आहेत. एकट्या पारनेर तालुक्याचे मूळ रहिवासी असलेल्यांची साडेतीन हजार घरे कामोठे वसाहतीत आहेत. जुन्नर, आंबेगाव येथील कुटुंब येथे स्थायिक झाली आहेत. याशिवाय कोकणातील मूळ रहिवासी येथे राहतात. त्यामुळे येथे स्थानिक गाववाल्यांपेक्षा बाहेरचेच जास्त उमेदवार इच्छुक आहेत.
प्रभाग क्र मांक-१३मधून पारनेरचे मूळ रहिवासी असलेले गोरख आहेर सेनेकडून तयारीत आहेत. मूळ सासवडच्या रेश्मा देशमुखही कामाला लागल्या आहेत. याशिवाय कोकणवासीय असलेल्या रेवती सकपाळ सेनेकडून इच्छुक आहेत. खांदा वसाहतीतून मूळचे बीडचे शिवाजी थोरवे यांना शेकापने रिंगणात उरवले आहे. मूळचे अहमदनगरचे विजय काळे यांच्या मातोश्री कुसुम काळे यांनी प्रचाराच्या दोन फे ऱ्या पूर्ण केल्या आहेत. शिवसेनेकडून कोकणवासीय सदानंद शिर्के इच्छुक आहेत. कोल्हापूरवासीय राजश्री पोवार यांना कमळाच्या चिन्हावर तिकीट फायनल झाले आहे.
ओबासी महिला राखीव असलेल्या जागेवर बीडच्या सविता मिसाळ यांनी भाजपाकडून इच्छुक म्हणून अर्ज भरला आहे. प्रभाग क्र मांक- १४मधून शिवसेनेकडून माजी महिला बालकल्याण सभापती दर्शना निकम यांचे नाव निश्चित समजले जाते. त्या रत्नागिरी-खेडच्या मूळ रहिवासी आहेत. कळंबोलीतून कळंबोली रोडपाली विकास आघाडीतून कोकणातील पार्श्वभूमी असलेले चंद्रकांत राऊत यांच्या नावावर मोहर उमटविण्यात आली आहे. आघाडीकडून मूळच्या केरळ राज्यातील सरोज मेनन, रेवती बैजू या महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्र मांक-९मधून उत्तरप्रदेशातील अनू दुबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्र मांक-१०मधून सोलापूर सांगोली येथील अशोक मोटे हे भाजपाकडून प्रबळ दावेदार आहेत. त्याचबरोबर सातारा म्हसवड माजी नगरसेवक शंकर विरकर इच्छुक आहेत. प्रभाग-८ मध्ये मूळचे उत्तरप्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील डी. एन. मिश्रा यांच्यावर शिवसेनेने शिक्कामोर्तब केलेला आहे.