बोनसच्या बहाण्याने पॉलिसीधारकांची लूट; ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

By सूर्यकांत वाघमारे | Published: September 4, 2023 07:10 PM2023-09-04T19:10:27+5:302023-09-04T19:10:46+5:30

२ कोटी २४ लाखाची फसवणूक : नफ्याचे आमिष दाखवून घालायचे गंडा, फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच त्या अनुशंघाने सायबर सेलच्या पथकाने तपासावर भर दिला होता.

Extortion of policyholders on the pretext of bonus; Online fraud gang arrested | बोनसच्या बहाण्याने पॉलिसीधारकांची लूट; ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

बोनसच्या बहाण्याने पॉलिसीधारकांची लूट; ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

googlenewsNext

नवी मुंबई : कामोठे येथील व्यावसायिकाची ऑनलाईन २ कोटी २४ लाखाची फसवणूक झाली होती. इंश्युरन्स पॉलिसीवर बोनस मिळवण्याच्या बहाण्याने त्यांना रक्कम गुंतवण्यास सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांची रक्कम हडप करून फसवणूक झाली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांची हरियाणा मधून तिघांना अटक केली आहे. 

फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच त्या अनुशंघाने सायबर सेलच्या पथकाने तपासावर भर दिला होता. यासाठी वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी उपनिरीक्षक रोहित बंडगर, पूनम गडगे, संदेश गुजर, अनिकेत पाटील व नरहरी क्षीरसागर यांचे पथक केले होते. त्यांनी तक्रारदार यांची फसवणूक केलेली रक्कम कोणत्या खात्यात गेली हे शोधण्यावर जोर दिला. यासाठी सायबर गुन्ह्यांच्या विश्लेषणाचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या महिला कर्मचारी पूनम गडगे यांनी कौशल्य पणाला लावले. त्यामध्ये हरियाणा मधील काही बँक खात्यांची माहिती समोर आली होती. त्याद्वारे संशयित आरोपींची माहिती मिळवून सायबर पोलिसांचे पथक त्याठिकाणी रवाना झाले होते. तिथे सापळा रचून प्रशांत चमोली याला ताब्यात घेण्यात आले होते. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या परवेज शरीफ व रणजित तिवारी यांनाही अटक करण्यात आली आहे. 

ऑनलाईन फसवणूक झालेल्या २ कोटी २४ लाखांपैकी १ कोटी ८० लाख रुपये हे प्रशांतच्या खात्यावर गेले होते. दरम्यान गुन्ह्यासाठी त्यांनी विविध बँकेतील १२ बनावट खाती वापरली होती. त्यामधून काही रक्कम प्रशांतच्या खात्यावर वळवण्यात आली होती. गुन्ह्यासाठी त्यांनी अज्ञात व्यक्तींच्या नावाचे सिमकार्ड वापरले होते. हे सिमकार्ड व पाच मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याच्यावर मुंबईत यापूर्वी देखील ऑनलाईन फसवणुकीचा एक गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले आहे.

Web Title: Extortion of policyholders on the pretext of bonus; Online fraud gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.