शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

पनवेलमध्ये भीषण पाणीसमस्या, एप्रिलपूर्वी आप्पासाहेब वेदक धरणाचा पाणीसाठा संपुष्टात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:46 AM

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सिडको वसाहतीत आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जात नाही.

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सिडको वसाहतीत आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जात नाही. विशेष म्हणजे, पनवेलला पाणीपुरवठा करणाºया आप्पासाहेब वेदक धरणातील पाणीसाठा एप्रिलपूर्वी संपुष्टात येणार असल्याने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात आप्पासाहेब वेदक धरण, एमजेपी, एमआयडीसी, सिडको आदी प्राधिकरणांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. यापैकी खारघर, कळंबोली, कामोठे नोडमध्ये सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर नवीन पनवेल शहराला एमजेपी व सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर पनवेल शहराला एमजेपी, आप्पासाहेब वेदक धरण व एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आप्पासाहेब वेदक धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापूर्वीच संपुष्टात येणार असल्याने पनवेलकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. सध्या स्थितीला महापालिका क्षेत्रात असलेल्या सिडको नोडपैकी खारघरमध्ये ७० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी ६५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तसेच कळंबोली शहराला ४२ एमएलडीची आवश्यक असताना, ३८ एमएलडी मिळतो, कामोठेला आवश्यकता ३८ एमएलडीची असून, ३५ एमएलडी मिळतो, नवीन पनवेल शहराला ४२ एमएलडी आवश्यकता असताना मिळते ३४ एमएलडी पाणी, पनवेल शहराला ३० एमएलडीची आवश्यकता असताना २० एमएलडी पाणी मिळते, तसेच पालिकेत समाविष्ट २९ गावांना २० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, केवळ दहा एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे, पालिकेत समाविष्ट ११ गावांना अद्याप बोरिंग, विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे.पावसाळ्यापूर्वीचे १०० दिवस हे महापालिकेसमोर आवाहन असणार आहे. याकरिता सिडको, एमजेपी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची मदत घ्यावी लागणार आहे.अमृत योजनेचा लाभ ३वर्षांनंतर४०० कोटींच्या अमृत योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत ४० पाणीसाठा करणाºया टाक्या नव्याने बांधल्या जाणार आहेत. १६५ कि.मी.ची जलवाहिनी याकरिता नव्याने टाकली जाणार आहे. मे २०१८ला या कामाला सुरु वात होणार आहे. पुढील तीन वर्षांत हे काम संपुष्टात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा होईल. मात्र, तोपर्यंत पाण्याच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी पालिकेला प्रभावी योजना आखावी लागणार आहे.११ गावे बोरिंगवर-पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांपैकी ११ गावांत अद्याप जलवाहिनी पोहोचलेली नाही. या ठिकाणच्या रहिवाशांना केवळ बोरिंग, विहीर आदी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. धानसर, रोहिंजण, खुटारी, एकटपाडा, किरवली, पिसार्वे, धारणा, धारणा कॅम्प, तुर्भे, करवले, बीड ही ११ गावे आहेत.निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागणार-१४ फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सत्ताधाºयांनी हा निर्णय मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. मात्र, महापौरांच्या दालनात २८ फेब्रुवारीला एमजेपी अधिकाºयांसोबत घेतलेल्या बैठकीत एमजेपी अधिकाºयांनी महानगरपालिकेला जादा पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे सांगितल्याने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रशासनाच्या निर्णयाचा अवलंब करावाच लागणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणीpanvelपनवेल