शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
2
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
3
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
4
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
5
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
7
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
8
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
9
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
10
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
11
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
12
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
13
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
14
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
15
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
16
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
17
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
18
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
19
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
20
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?

मयत सासऱ्याच्या घरावर जावयाचा डोळा; भावासाठी बहिणीने सोडले प्राण

By सूर्यकांत वाघमारे | Published: September 02, 2022 8:59 PM

भावाकडून घरात हिस्सा मागण्यासाठी नवरा आणि सासूकडून छळ सुरू होता.

नवी मुंबई : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या घरात हिस्सा मागण्यासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ सुरु होता. परंतु आई वडिलांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या भावाच्या विचाराने बहिणीकडून त्यासाठी नकार दिला जात होता. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. भावाच्या तक्रारी नंतर हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेरुळ सेक्टर २० येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला असून, श्रुती माने (२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नेरुळ येथे राहणाऱ्या निलेश माने याच्यासोबत तिचा प्रेमविवाह झालेला आहे. तिच्या आईचे २०२० मध्ये निधन झाल्यानंतर वर्षभरात तिचे निलेश सोबत लग्न लावून देण्यात आले होते. लग्नानंतर तिने जुनी नोकरी सोडून आईच्या पाश्च्यात भाऊ व वडिलांकडेही लक्ष देण्यासाठी तिने मानखुर्द मध्येच अंगणवाडी सेविकेची नोकरी स्वीकारली होती. परंतु पृवीच्या नोकरीत मिळणाऱ्या पगारात व सध्याच्या पगारात तफावत असल्याने त्यावरून पती निलेश हा तिच्यासोबत वाद घालत होता. तिच्याकडे अधिक रकमेची मागणी करत तिचा छळ सुरु असतानाच ऑगस्ट महिन्यात तिच्या वडिलांचे निधन झाले.

यामुळे एकाकी पडलेल्या भावाची तिला चिंता लागली होती. अशातच वडिलांच्या निधनानंतर मानखुर्द येथील घराचा भावाकडे हिस्सा मागण्यासाठी तिच्यावर पती व सासूकडून दबाव टाकला जात होता. याच कारणातून २९ ऑगस्टला तिला घरातून हाकलून देण्यात आले होते. यावेळी तिने मानखुर्द येथील माहेरी जाऊन घडलेल्या प्रकाराबद्दल भावाकडे आक्रोश केला होता. त्यावेळी भावाने त्यावर तोडगा काढू असे सांगून तिला सासरी पाठवले होते. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी तिने गळफास लावून आत्महत्या केली. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिचा भाऊ अजय जाधव याने पोलिसांकडे केली आहे. त्याद्वारे गुरुवारी नेरुळ पोलीस ठाण्यात पती निलेश माने व सासू नंदा माने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दिवशी कोपर खैरणेत देखील विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे शहरात विवाहितेच्या हुंड्यासाठी छळाच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी