पनवेल महापालिकेत फेसडिटेक्टर मशिन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 12:30 AM2018-11-02T00:30:38+5:302018-11-02T00:31:04+5:30

पनवेल महापालिकेत फेसडिटेक्टर मशिन बसविण्यात आले आहे. या मशिनद्वारे पालिकेतील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी लागणार असून, कामचुकार कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे.

Facedictor Machin in Panvel Municipal Corporation | पनवेल महापालिकेत फेसडिटेक्टर मशिन

पनवेल महापालिकेत फेसडिटेक्टर मशिन

Next

- वैभव गायकर

पनवेल : पनवेल महापालिकेत फेसडिटेक्टर मशिन बसविण्यात आले आहे. या मशिनद्वारे पालिकेतील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी लागणार असून, कामचुकार कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे. सध्याच्या घडीला पालिकेचे मुख्यालय व विभाग कार्यालयासह इतर २१ ठिकाणी फेसडिटेक्टर मशिन बसविण्यात आलेल्या आहेत.

पनवेल महापालिकेत सध्याच्या घडीला ७०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. यापूर्वी बायोमेट्रिक हजेरीद्वारे कर्मचाºयांची हजेरी लावली जात असे. मात्र, त्या मशिनद्वारे केवळ बोटांचे ठसे ग्राह्य धरले जात असत. अशा वेळी अनेक कर्मचारी हाताला तसेच बोटाला लागल्याचे कारण पुढे करीत मॅन्युअली हजेरी लावण्याचा आग्रह धरत असत. मात्र, बायोमेट्रिक हजेरीला पर्याय म्हणून फेसडिटेक्टर मशिनचा पर्याय उपलब्ध आहे. या मशिन समोर जोपर्यंत चेहरा येत नाही, तोपर्यंत हजेरी लागणार नसल्याने कामचुकार कर्मचाºयांना चाप बसणार आहे. विशेष म्हणजे, महिन्यातून तीन वेळा गैरहजर राहिल्यास त्या कर्मचाºयाची किरकोळ रजा ग्राह्य धरली जाणार आहे. चौथ्या वेळी गैरहजर राहिल्यास संपूर्ण दिवसांचे वेतन कपात केली जाणार आहे. या मशिनची किंमत १८ हजार ९९९ इतकी आहे. पनवेल महापालिका ६० मशिन टप्प्याटप्प्याने विकत घेणार आहे. पनवेल महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

विविध कारणे दाखवून कामचुकारपणा करणाºया कर्मचाºयांना फेसडिटेक्टर मशिनद्वारे लगाम बसणार आहे. पनवेल महापालिकेच्या कामकाजात यामुळे सुसूत्रता येणार आहे.
- जमीर लेंगरेकर,
उपायुक्त, पनवेल महापालिका

Web Title: Facedictor Machin in Panvel Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.