फावल्या वेळेत रील्स बनविणे नडले, पालिकेच्या ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 10:26 AM2024-01-28T10:26:22+5:302024-01-28T10:26:50+5:30

Panvel: पनवेल महापालिकेत कर्तव्यावर असताना फावल्या वेळेत रील्स बनविणे ६ कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. कार्यालयीन वेळेत व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आयुक्त गणेश देशमुख यांनी निलंबन केले.

Failure to make reels in spare time, suspension of 5 contract employees of the municipality | फावल्या वेळेत रील्स बनविणे नडले, पालिकेच्या ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

फावल्या वेळेत रील्स बनविणे नडले, पालिकेच्या ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

पनवेल - पनवेल महापालिकेत कर्तव्यावर असताना फावल्या वेळेत रील्स बनविणे ६ कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. कार्यालयीन वेळेत व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आयुक्त गणेश देशमुख यांनी निलंबन केले.

पालिकेत एका प्रायव्हेट लिमिटेड कंत्राट कंपनीकडून मनुष्यबळ पुरविले जाते. या कंत्राटदारामार्फत भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे इन्स्टावर अनेक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाले. यामध्ये एका कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचादेखील समावेश आहे. व्हायरल होत असलेले व्हिडीओ पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनादेखील प्राप्त झाले. त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त कैलास गावडे यांना दिले. त्यानुसार रिल्समध्ये सहभाग असलेला महेंद्र ठाकूर, आश्विनी नानासो हजारे, सुनीता सुजित नाईक, सुलोचना गडहिरे, अमर नाईक हे पाच कंत्राटी कामगार डेटा इन्ट्री ऑपरेटर आहेत.

कारणे दाखवा नोटीस 
पालिकेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून लिपिक पदावर काम करणारे आकाश केणी यांचा सहभाग होता.  कंत्राटी कामगारांचे थेट निलंबन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून लिपिक आकाश केणी याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत कारणे दाखवा नोटीस दिली आहे. 

कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही. कर्मचाऱ्यांनी नियमात आणि शिस्तीत काम केलेच पाहिजे. अशा प्रकारे व्हिडीओ बनवून प्रसारित करणे म्हणजे पालिका प्रशासनाच्या कामकाजावर गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. यामुळे तत्काळ या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
- गणेश देशमुख, आयुक्त, 
पनवेल महानगरपालिका

Web Title: Failure to make reels in spare time, suspension of 5 contract employees of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.