नवी मुंबई : ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे लोककवी हरेंद्र जाधव (वय ८७) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हरेंद्र जाधव यांनी तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, आता तरी देवा मला पावशील का, माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारु, पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, यासारखी जवळपास दहा हजार लोकप्रिय गाणी गाणी लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजविले होते. (famous lyricist harendra jadhav passes away)
गेल्या काही वर्षांपासून हरेंद्र जाधव हे पक्षाघाताने आजारी होते. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. अखेर प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. हरेंद्र जाधव हे पेक्षाने शिक्षक होते. त्याचबरोबर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन ते समाजकार्यात ओढले गेले.
१० हजारहून अधिक गाणी लिहिलीआता तरी देवा मला पावशील का?, तूच सुख कर्ता..तुच दुःख हर्ता, देवा मला का दिली बायको अशी, माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू, हा संसार माझा छानं, राव दिला मला देवानं, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? अशी १० हजारहून अधिक गाणी हरेंद्र जाधव यांनी लिहिली आहेत. तसेच, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवालपासून ते बेला सुलाखे, साधना सरगमपर्यंत अनेक गायक, गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत.