पनवेल - बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखाने शेतकरी महेंद्र देशमुख यांची फसवणूक केली असल्याचा आरोप देशमुख या शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या नावावर तीन वेळा ८ लाख असे 24 लाख बॅंकेने वर्ग केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांना एकही रूपया मिळालेला नाही. आपल्या खात्यात बॅंकेचे पैसे आले नसूनही बँक कर्ज फेडण्यासाठी तगादा लावत असल्याचा देशमुख यांचा आरोप आहे. याबाबत पनवेल तहसील कार्यालयाकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी लहान मुलीसह पोलिसांच्या ताब्यात
त्यानंतर काल वांद्रे येथील मातोश्रीवर घुसण्याचा महेंद्र देशमुख यांनी आपल्या मुलीसह प्रयत्न केला होता. आज शेतकरी देशमुख यांच्याकडून जबरदस्तीने तहशील कार्यालय बंद करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीसांकडून त्यांना अडवण्यात आले आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकऱ्यांना त्वरीत पनवेल तहसील कार्यालयात बोलविण्याची देशमुख यांनी मागणी केले आहे.