न घेतलेल्या कर्जाच्या बोजाप्रकरणी शेतकऱ्याचे पुन्हा पनवेलमध्ये आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:36 AM2020-01-07T05:36:00+5:302020-01-07T05:36:06+5:30

पनवेल तालुक्यातील सवणे गावातील शेतक-याने पुन्हा सोमवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न करत तहसीलदार डॉ. अमित सानप यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.

Farmers' agitation again in Panvel for non-payment of unpaid debts | न घेतलेल्या कर्जाच्या बोजाप्रकरणी शेतकऱ्याचे पुन्हा पनवेलमध्ये आंदोलन

न घेतलेल्या कर्जाच्या बोजाप्रकरणी शेतकऱ्याचे पुन्हा पनवेलमध्ये आंदोलन

Next

कळंबोली : न घेतलेल्या आठ लाखांचा कर्जाचा बोजा बँक आॅफ इंडियाने चढविण्याची तक्रार करत पनवेल तालुक्यातील सवणे गावातील शेतक-याने पुन्हा सोमवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न करत तहसीलदार डॉ. अमित सानप यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. मातोश्रीवर जाऊन रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. ती होऊ शकली नसली, तरी हे शेतकरी कुटुंब चर्चेत आले होते.
त्यांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत त्यांच्याकडील कर्जाच्या कागदपत्रांची तपासणी केली. या चर्चेत देशमुख यांनी कर्ज घेतल्याचे स्पष्ट करत बँकेच्या व्यवस्थापकांनी त्याबाबतचे स्टेटमेंटही सादर केले. याबाबतचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सवणे येथील महेंद्र देशमुख यांचे बँक आॅफ इंडियाच्या आपटे शाखेत खाते आहे. त्यात त्यांची काही रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये होती. २००६ मध्ये यांनी वीटभट्टीसाठी दोन लाखाचे कर्ज घेतले होते. याची मुदत वाढवून २००८ पर्यंत त्यांनी आठ लाखांचे कर्ज आपटे शाखेतून घेतल्याचे बँकेचे म्हणणे आहे. जर मी कर्ज घेतले असते, तर बँक आठ वर्षे थांबली असती का असा प्रश्न देशमुख यांनी विचारला. बँकेने देशमुख यांच्या सावणे येथील १३०२ चौरस फुटाच्या घरावर आठ लाखांच्या कर्जाचा बोजा चढवला.
२००८ ला कर्ज घेतले असेल तर २००९ ला बोजा चढवायचे कारण काय असाही प्रश्न देशमुख यांनी केला. देशमुख व त्यांची पत्नी सरिता यांच्या नावे असलेले दोन लाख ८०,००० रुपये बँकेने न विचारताच वळते करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पोटाला चिमटे देऊन पै पै जमा केली आणि बँकेच्या अधिकाºयांनी ती परस्पर वळवली, हा अन्याय असल्याचे म्हणणे देशमुख यांनी तहसीलदार डॉ अमित सानप यांच्यासमोर मांडले. याबाबत देशमुख, तहसीलदार डॉ. अमित सानप, आपटा बँक शाखेचे अधिकारी कृषीमंत्री दादा भिसे यांना रात्री भेटले.
>आठ दिवसांत अहवाल देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश
पनवेल तालुक्यातील आपटा शाखेतील बँक आॅफ इंडियात फसवणूक झाल्याचा आरोप करीत आंदोलन करणाºया महेंद्र देशमुख या शेतकºयाची कैफियत कृषी मंत्री दादा भुसे यांनी ऐकून घेतली. या प्रकरणाची त्रिस्तरीय समितीमार्फत आठ दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाºयांना दिले. विभागाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी एका शेतकºयाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याची भावना कृषिमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.
>महेंद्र देशमुख कर्ज न घेतल्याचे सांगत आहेत. त्याबाबत त्यांनी काही पत्रव्यवहार केले आहेत. त्यांच्या तक्रारीबाबत बँकेच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. बँक व तक्रारदार यांच्या चर्चेअंती तक्रारदाराने कर्ज घेतल्याचे बँक व्यवस्थापकांनी स्पष्ट करीत स्टेटमेंटही सादर केले. पुढील कार्यवाहीसाठी शासनाला कळविण्यात आले आहे.
- डॉ. अमित सानप, तहसीलदार

Web Title: Farmers' agitation again in Panvel for non-payment of unpaid debts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.