पनवेल: नैना प्रकल्पाविरोधात पनवेल तालुक्यातील तूरमाळे गावात पुकारलेले बेमुदत उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच आहे.दि.11 रोजी सिडकोविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी मुंबई गोवा महामार्ग दुपारी 2.30 मिनिटांनी अडवला.यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.
या रस्ता रोकोत महिलांनी पुढाकार घेतला.सहाव्या दिवशी नैना विरोधात शांततेत उपोषण सुरु होते.दुपारी दोन च्या सुमारास सिडको आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी आले मात्र ठोस आश्वासन दिले गेले नसल्याने तुरमाळे गावाजवळ महिलांनी मुंबई गोवा महामार्ग चक्का जाम केला.या आंदोलनात वाहनांचा मोठा खोळंबा झाला.यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.नैना विरोधात सात शेतकरी उपोषणाला बसले आहेत त्यापैकि एकाची प्रकृती ढासळली आहे.शिवकरचे माजी सरपंच ,प्रकल्पग्रस्त नेते अनिल ढवळे यांच्या पुढाकाराने हे बेमुदत उपोषण पुकारण्यात आले आहे.नैना प्रकल्पाला आमचा विरोध नाही मात्र या प्रकल्पातील जाचक अटी शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहेत.त्याबाबत शासनाने विचार करावा अशी मागणी अनिल ढवळे यांनी केली आहे.माजी आमदार बाळाराम पाटील यांनी देखील उपोषण कर्त्यांना आपला पाठिंबा दर्शवला असून शेकाप आमदार जयंत पाटील यांनी आधिवेशात नैनाचा मुद्दा उपस्थित केला आहे.