- नामदेव मोरे नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थेट शेतक-यांचा संपर्क कमी झाला आहे. भाजी, फळ व कांदा मार्केटमध्ये २० टक्केच शेतकरी स्वत: माल पाठवत आहेत. उर्वरित माल मध्यस्थी व्यापाºयांकडूनच येत आहे. धान्य व मसाला मार्केटमध्ये शेतकरी स्वत: माल पाठवतच नाहीत. प्रशासनाने ठोस उपाययोजनाच केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, येथील शेतकरी निवासही ओस पडले असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने नोव्हेंबर २००३ मध्ये फळ मार्र्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह इमारतीमध्ये शेतकरी निवास तयार केले; परंतु याचा वापरच झाला नाही. बाजार समितीमध्ये थेट शेतकºयांचा संपर्क कमी झाल्यामुळे व शेतकºयांसाठीच्या या सुविधेची माहितीच नसल्यामुळे निवासस्थान धूळखात पडले होते. बाजार समिती शेतकºयांच्या हितासाठी उपाययोजना राबवत असल्याचे प्रशासनाला दाखवून द्यायचे असल्यामुळे, जानेवारी २०१८ मध्ये शेतकरी निवासाचे नूतनीकरण केले. फक्त १०० रुपये भरून एक दिवस थांबण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु शेतकरीच मार्केटमध्ये येत नसल्याने प्रत्यक्षात याचा वापर फारसा होत नाही. वर्षाला सात हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच बाजारपेठांमध्ये होत असते. देशातून व विदेशातूनही माल येथे विक्रीसाठी येत असतो. थेट शेतकरी आल्यास त्यांच्यासाठी काय सुविधा आहे याविषयी माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला असता, बाजार समितीची यासाठी ठोस यंत्रणाच नसल्याचे निदर्शनास आले.येथील प्रत्येक मार्केटमध्ये सातारा जिल्ह्यातील एक शेतकरी जाऊन आम्हाला थेट मालाची विक्री करायची आहे, काय करता येईल, याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक मजेदार गोष्टी निदर्शनास आल्या. मार्केटमध्ये शेतकºयांसाठी माहिती केंद्रच उपलब्ध नाही. सर्व व्यापाºयांची यादी व त्यांची वार्षिक उलाढाल, संपर्क नंबर तत्काळ उपलब्ध होतील याची काहीच यंत्रणा नाही. आवक गेटवरील कर्मचाºयांनी त्यांच्या पद्धतीने माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. काहींनी कोणत्या व्यापाºयाकडे जायचे याविषयी माहिती दिली; परंतु ही माहिती देताना अशाप्रकारे कोणी शेतकरी थेट मार्केटमध्ये येत नाही. व्यापाºयांशी ज्यांचे जुने संबंध आहेत तेच येथे येत असल्याचेही सांगण्यात आले. शेतकºयांना थेट माल विक्री करण्यासाठीही फारशी सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. व्यापाºयांशी चर्चा केली असता कांदा, बटाटा व फळ मार्केटमध्ये फक्त २० टक्के शेतकरी स्वत: त्यांचा माल विक्रीसाठी पाठवत असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित माल तेथील व्यापाºयांकडूनच विक्रीसाठी येत आहे. मसाला व धान्य मार्केटमध्ये शेतकरी जवळपास फिरकतच नसल्याचे निदर्शनास आले.>निवासामध्ये राहण्यासाठी सात-बारा घेऊन फिरायचे का?शेतकरी निवासामध्ये राहण्यासाठी सात-बारा उतारा, पॅन कार्ड व आधार कार्ड सक्तीचे आहे. व्यापाºयाचे व बाजार समितीचे पत्रही देणे आवश्यक आहे; परंतु शेतकरी सात-बारा उतारा घेऊन फिरणार का? बाजार समितीने फोटोसाठी एखादा पुरावा व आॅनलाइन सात-बारा चेक करून निवासस्थान उपलब्ध करून द्यावे व शेतकरी निवासाच्या सुविधेचे फलक प्रत्येक आवक व जावक गेटवर लावण्याची आवश्यकता आहे.>तुम्हाला पैसे मिळणार नाहीतफळ मार्केटच्या आवक गेटवर शेतकरी चौकशीसाठी गेले. सातारावरून स्ट्रॉबेरी आणली असल्याचे सांगितले. कर्मचाºयांनी तुम्ही येथे माल विकूच नका. येथील व्यापारी बदमाश आहेत. तुम्हाला पैसे मिळण्याची खात्री नाही, अशाप्रकारे माहिती देण्यात आली. मार्केट व एपीएमसीविषयी कर्मचाºयांनाच आस्था नसल्याचे पाहून शेतकरी आश्चर्यचकीत झाले. फळ मार्केटमधील उपसचिव राजाराम दौंडकर यांची भेट घेतली असता, त्यांनी मात्र शेतकºयांची आस्थेने चौकशी करून आवश्यक ती सर्व मदत करून काही अडचण आली तर थेट मला भेटा, असे सांगून दिलासा दिला.>तीन मार्केटमध्ये दिली विक्रीची माहितीकांदा - बटाटा, मसाला व धान्य मार्केटमध्ये विविध प्रकारचा माल विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्यानंतर कोणत्या व्यापाºयाकडे जावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. थेट विक्री करताना काय अडथळे येतात, या विषयीही माहिती देण्यात आली; परंतु बहुतांश जण मुंबईत थेट शेतकरी येत नसल्याचेच सांगत होते.
बाजार समितीशी शेतकऱ्यांचा थेट संपर्क कमीच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 12:49 AM