शेतकऱ्यांनो क्षणिक सुखासाठी जमिनी विकू नका; बी. जी. कोळसेपाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 12:25 PM2023-10-08T12:25:33+5:302023-10-08T12:26:15+5:30

उरण परिसराचा वरवर होणारा विकास हा येथील जनतेला भकास करणारा आहे. जमीन ही काळी आई आहे.

Farmers do not sell land for temporary pleasure; B. G. Kolsepatil's appeal to farmers | शेतकऱ्यांनो क्षणिक सुखासाठी जमिनी विकू नका; बी. जी. कोळसेपाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांनो क्षणिक सुखासाठी जमिनी विकू नका; बी. जी. कोळसेपाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन

googlenewsNext

मधुकर ठाकूर 

उरण : उरण परिसराचा वरवर होणारा विकास हा येथील जनतेला भकास करणारा आहे. जमीन ही काळी आई आहे. ती पुन्हा निर्माण होणार नाही. तीला क्षणिक सुखासाठी शेतकऱ्यांनी कवडीमोलाने  विकू नये असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे- पाटील यांनी शनिवारी उरण येथील एका  जाहीर कार्यक्रमातुन केले.

उरण येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि ५० वर्षातील विविध सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल शनिवारी (७) सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जेएनपीए कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 
 यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मानव जात एक आहे. तर मग जात, पात, धर्माच्या नावाने माणसा माणसात भेदभाव का ? असा सवालही कोळसे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी संपत्तीचा अधिकार दिला. तर महात्मा फुले,सावित्रीबाई यांनी शिक्षण दिले. मात्र आज शिक्षणाचे बाजारीकरण व खाजगीकरण करून पुन्हा समाजाला शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाला गरीब , अशिक्षित , अज्ञानी ठेवून राज्यकर्ते राज्य करीत आहेत. प्रामाणिकपणा हा न भिणारे जीवन  आहे. शिक्षण हे स्वतंत्र विचार करायला शिकवते म्हणूनच माणूस म्हणून जन्माला आलो त्या समाजासाठी जगले पाहिजे, निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम केले पाहिजे.भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे हक्कासाठी जनशक्ती व अहिंसेच्या मार्गाने  ढण्याचे आवाहनही कोळसे पाटील यांनी केले. 

यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, सुरेश ठाकूर, भूषण पाटील,सुधाकर पाटील,गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, नरेश रहाळकर, ॲड .सुरेश ठाकूर, अनिल जाधव, शाम कुलकर्णी , जीवन गावंड, महेश म्हात्रे आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

Web Title: Farmers do not sell land for temporary pleasure; B. G. Kolsepatil's appeal to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.