नैनाविरोधात शेतकऱ्यांची सिडकोवर धडक, प्रकल्प रद्द करण्याची केली मागणी

By कमलाकर कांबळे | Published: March 23, 2023 07:05 PM2023-03-23T19:05:42+5:302023-03-23T19:05:52+5:30

सिडकोच्या नैना प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

Farmers strike CIDCO against Naina, demand cancellation of project | नैनाविरोधात शेतकऱ्यांची सिडकोवर धडक, प्रकल्प रद्द करण्याची केली मागणी

नैनाविरोधात शेतकऱ्यांची सिडकोवर धडक, प्रकल्प रद्द करण्याची केली मागणी

googlenewsNext

नवी मुंबई: सिडकोच्या नैना प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तो रद्द करावा या मागणीसाठी २३ गावांतील ग्रामस्थांनी गुरुवारी लाँग मार्च काढून सिडकोवर धडक दिली. नैना प्रकल्पबाधीत शेतकरी उत्कर्ष समितीच्या बॅनरखाली महाविकास आघाडीसह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.

यामुळे सायन-पनवेल महामार्गावरही काही काळ कोंडी झाली होती. परंतु, शेतकर्यांनी शिस्तीचे दर्शन घडविल्यामुळे पोलिसांवरील मोठा ताण दूर झाला.
सिडकोच्या माध्यमातून नैनाच्या पहिल्या टप्प्यात २३ गावांचा समावेश करून पायलट प्रोजेक्ट उभारला जात आहे. मात्र, येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा नैनाला विरोध आहे. त्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून विविध स्तरावर आंदोलने केली जात आहे. गावोगावी बैठका घेवून नैना प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आणि ग्रामस्थांत जनजागृती केली जात आहे.

त्याचप्रमाणे २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत प्रत्येक गावात एक दिवस बंद पाळण्यात आला. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात नैना हटविण्याबाबत काही तरी निर्णय होईल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र यासंदर्भात काहीच निर्णय न झाल्याने नैना प्रकल्पबाधीत उत्कर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी पनवेल ते बेलापूर येथील सिडकोभवनपर्यंत निषेध रॅली काढली. उत्कर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांची भेट घेवून नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

यासंदर्भात शिष्टमंडळाने राजेश पाटील यांना सविस्तर निवेदनही दिले आहे. या शिष्टमंडळात माजी आमदार बाळाराम पाटील, ॲड. सुरेश ठाकूर, वामन शेळके, राजेश केणी, बबन पाटील, सुदाम पाटील, अनिल ढवळे आदींचा समावेश होता. दरम्यान, नैना प्रृकल्प रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिष्टमंडळातील नेत्यांनी सिडकोला दिला आहे.

Web Title: Farmers strike CIDCO against Naina, demand cancellation of project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.