कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांना लाभ होणार - रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:35 AM2018-12-29T03:35:23+5:302018-12-29T03:35:50+5:30

कृषी महोत्सव सामान्य शेतक-यांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा

Farmers will benefit from the Agri Festival: Ravindra Chavan | कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांना लाभ होणार - रवींद्र चव्हाण

कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांना लाभ होणार - रवींद्र चव्हाण

Next

पनवेल : कृषी महोत्सव सामान्य शेतकºयांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्र वारी कामोठेत आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आपले मत मांडले.

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने खांदेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय रायगड जिल्हा कृषी महोत्सव २0१८ -१९ चे उद्घाटन राज्यमंत्री व रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक स्टॉल्सला भेट देऊन त्यांची विचारपूस केली तसेच त्यांच्याकडून उत्पादनाविषयी माहिती घेतली त्याचबरोबर त्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना, कृषी विभाग शेतकºयांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करीत असून हा महोत्सव सामान्य शेतकºयांना व्यासपीठ मिळवून देणारा उपक्र म आहे, अशा शब्दात या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. खाडी व समुद्राच्या उधाणामुळे पीक धोक्यात असते, त्यामुळे त्यासाठी सक्षम पर्याय देणे ही काळाची गरज आहे, त्या अनुषंगाने कडधान्य पीक घेतले जात आहे.

शेतीसोबत मत्स्य शेतीला प्राधान्य देणे ही गरज लक्षात घेता मागेल त्याला शेततळे देण्यात येत आहे. तरु णवर्ग स्थलांतरित होऊ नये, यासाठी शेतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; पण त्याची साठवणूक होत नाही हे लक्षात घेऊन साडेचार हजारपेक्षा जास्त वनबंधारे बांधण्याचे काम करण्यात आले, अशी माहिती देतानाच धरण, तलाव आदी जलाशयातून लोकसहभातून साडेतीन लाखांपेक्षा मेट्रिक गाळ काढण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले. विकासापासून दूर असलेल्या हिरवे गावात सरपंच पोपटराव यांनी शेतीला प्राधान्य देऊन गावाची प्रगती करून आदर्श दिला. तो आदर्श घेऊन शेतकºयांनी काम करावे, असा मौलिक सल्लाही दिला. त्याचबरोबर शेतकºयांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी या वेळी दिली.

प्रास्ताविक कोकण विभाग कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी केले. या महोत्सवात उत्कृष्ट शेतकरी व शेतकरी गटांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रदर्शनास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, नगरसेविका हेमलता गोवारी, संतोषी तुपे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Farmers will benefit from the Agri Festival: Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.