लोकमत न्यूज नेटवर्कवडखळ : गेल्या काही वर्षांत शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हे अर्थशास्त्राचे मूळ आहे. त्यामुळे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा, असे प्रतिपादन पेण-पाली मतदारसंघाचे आमदार धैर्यशील पाटील यांनी पेण तालुक्यातील गणपतीवाडी येथे आयोजित कार्यक्रमात काढले. कोकण कृषी, फलोत्पादन, पर्यटन, सौरऊर्जा, दुग्धविकास, पशुसंवर्धन, औषधे, सेंद्रिय उत्पादने, खते यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. यू. व्ही. महाडकर, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेकर, राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष चंद्रकांत मोकल, शिरीष देशपांडे, डॉ. एल. ए. चव्हाण, भात शास्त्रज्ञ डॉ. विजय देशपांडे, जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी के. बी. तरकसे, तुषार म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. हेटवणे धरण होऊन ३५ वर्षे झाली, तरी तालुक्यातील खारेपाटातील पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी 30 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, लवकरच त्याचे उद्घाटन होईल आणि खारेपाटातील जनतेला पाणी मिळेल, २००७ मध्ये शासनाने कालव्यांची बंद केलेली कामे पुन्हा सुरू करावीत यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा
By admin | Published: May 08, 2017 6:28 AM