दुचाकी रॅलीत महिलांची फॅशन परेड, पनवेलमध्ये अनोखे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 06:46 AM2018-03-11T06:46:04+5:302018-03-11T06:46:04+5:30
शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी झाशीची राणी, शंभूराजे, बाजीप्रभू, नवरा-नवरी, क्रिकेटर अशा वेगवेगळ्या वेशभूषेत सुमारे १०० महिला दुचाकीस्वारांनी रॅलीत सहभाग नोंदवला. त्यांचे काही सोसायट्यांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.
पनवेल - शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी झाशीची राणी, शंभूराजे, बाजीप्रभू, नवरा-नवरी, क्रिकेटर अशा वेगवेगळ्या वेशभूषेत सुमारे १०० महिला दुचाकीस्वारांनी रॅलीत सहभाग नोंदवला. त्यांचे काही सोसायट्यांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.
जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ होते. महिलांच्या पेट्रोलवर चालणाºया दुचाकीच्या रॅलीमुळे पनवेलकरांना दुचाकीवरून फॅशन परेड पाहण्याची संधी मिळाली. रॅलीत सहभागी झालेल्या ८४ वर्षांच्या प्रतिभा दळवी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रंगनिल इंडो फाउंडेशन, गोमाता नॅचरल्स , प्लॅनेटी मनी, मायक्रोन मेट्रोपोलीस यांच्यातर्फे पनवेलमध्ये पहिल्यांदाच अशी आगळी वेगळी रॅली काढण्यात आली होती. शनिवारी सकाळी ८.३० वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. त्यापूर्वी आमदार व खंडाळा येथील महिला पोलीस ट्रेनिंग स्कूलच्या प्राचार्य स्मिता पाटील यांनी स्पर्धकांना रॅलीची थीम समजावून सांगितली. बाजीप्रभू बनलेल्या मानसी करंदीकर, हवाहवाई फेम श्रीदेवी बनलेल्या स्मिता झेमसे, फलंदाज सीमा बाबेल, नवरा-नवरी बसलेल्या वर्षा ठाकरे व मंजू अमिन, सैनिक वेशभूषेतील शिल्पा चांदणे व अरुंधती बनसोडे, तर शंभूराजे व येसूबार्इंच्या वेषातील योगिता देशमुख, प्रीती मोरे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
नवीन पनवेल, खांदा वसाहतीमधून परतत मिडलक्लास सोसायटीत रॅली संपली. त्यानंतर खंडाळा येथील महिला पोलीस ट्रेनिंग स्कूलच्या महिला छात्रांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली. उपमहापौर चारुशीला घरत, सभागृहनेते परेश ठाकूर, अर्चना ठाकूर, वर्षा ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, ममता म्हात्रे, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, विभा चव्हाण यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला.
या वेळी महिला पोलीस ट्रेनिंग स्कूलच्या प्राचार्य स्मिता पाटील यांनी ‘हेल्मेट घातले नाही तर यमराज वाट पाहत आहे’, हा चांगला संदेश दिला. कल्पना लोखंडे, मिसेस महाराष्ट्र २०१८ किरण राजपूत, शीतल ठक्कर व मुक्ता गुप्ते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल
वेशभूषा : वैयक्तिक- १. कविता ठाकूर (धरती माता), २. सीमा बाबेल (फलंदाज), ३. मानसी करंदीकर (बाजीप्रभू).दोघांमध्ये- १. संचिता/रचना, २. योगिता/प्रीती, ३. मनोरमा/भाग्यश्री.
बाईक सजावट : वैयक्तिक :
१. ललिता बोराले (झाशीची राणी घोडा), २. रीना परमा, ३. नीता कोटक
दोघांची : १. संचिता जोशी/रचना,
२. अपर्णा/मनीषा, ३. ख्याती/कविता,
बेस्ट थीम : फेस आॅफ वुमेन .. बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत.
उत्तेजनार्थ : निशिगंधा पाटील, शिल्पा/ अरु ंधती, ज्येष्ठ महिला प्रतिभा दळवी.