५५७ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात होणार बंद

By admin | Published: February 21, 2017 06:22 AM2017-02-21T06:22:10+5:302017-02-21T06:22:10+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणूक मतदानासाठी जिल्हा

The fate of 557 candidates will be stopped in the machine | ५५७ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात होणार बंद

५५७ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात होणार बंद

Next

अलिबाग : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणूक मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी निर्भय व मुक्तपणे मतदान करून आपली लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी तेली-उगले म्हणाल्या की, मंगळवारी होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ५९ जिल्हा परिषद गटासाठी, तर ११८ पंचायत समिती गणासाठी निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी १४ लाख ६२ हजार ८८९ मतदार आहेत. जिल्ह्यात १ हजार ९४० मतदान केंदे्र असून २३३ झोनमध्ये त्यांची विभागणी केली आहे. निवडणूक प्रक्रि या सुव्यवस्थितपणे व्हावी याकरिता जिल्ह्यात १२ हजार ८०४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होणार आहे. तसेच मतमोजणी २३ फेब्रुवारी २०१७ रोजी होईल. निवडणूकमुक्त व निर्भय वातावरणात होण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-२०१७साठी मंगळवार, २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होणार आहे. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्या क्षेत्रांतील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान दिनी मंगळवार, २१ फेब्रुवारी २०१७ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे व आठवडा बाजारदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ११८ जागा
अलिबाग : निवडणुकीच्या रणांगणावरील प्रचाराचा धुरळा रविवारी खाली बसल्यानंतर आता मंगळवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८३, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३७४, असे एकूण ५५७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. मतदान शांततेत आणि निर्भीड वातावरणात पार पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. २३ फेब्रुवारीला सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अलिबाग तालुक्यातील थळ मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार मानसी दळवी आणि शेकापच्या चित्रा पाटील यांच्यामध्ये लढत आहे. शहापूर मतदार संघातील शेकापच्या सुश्रूषा पाटील विरुद्ध उज्ज्वला पाटील यांच्या लढतीकडे सर्वांचेचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे आदिती तटकरे राजकीय नशीब आजमावत असल्याने रोहे तालुक्यातील वरसे मतदार संघामध्येही प्रतिष्ठेची लढत आहे.
आदिती यांच्याविरोधात भाजपाच्या श्रद्धा घाग या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आदिती या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. २१ फेब्रुवारीला मतदान पार पडल्यानंतर २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मतपेट्या उघडल्यानंतरच जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे. हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर सर्वाधिक उमेदवार निवडून आलेला पक्ष सत्तास्थापनेचा दावा करू शकणार आहे. यामुळे मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

चोख पोलीस बंदोबस्त

च्कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी ८, पोलीस निरीक्षक २२, सहायक पोलीस निरीक्षक/ पोलीस सब इन्स्पेक्टर १५४, पोलीस कर्मचारी १९९०, होमगार्ड ५५०, राज्य राखीव दल पोलीस पथक-१, शीघ्रकृती दल पथक-१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी एकूण पाच निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

12,804

कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी करण्यात आली आहे. मतदान मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होणार आहे. मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात होण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Web Title: The fate of 557 candidates will be stopped in the machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.