शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

५५७ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात होणार बंद

By admin | Published: February 21, 2017 6:22 AM

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणूक मतदानासाठी जिल्हा

अलिबाग : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणूक मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी निर्भय व मुक्तपणे मतदान करून आपली लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.जिल्हाधिकारी तेली-उगले म्हणाल्या की, मंगळवारी होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ५९ जिल्हा परिषद गटासाठी, तर ११८ पंचायत समिती गणासाठी निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी १४ लाख ६२ हजार ८८९ मतदार आहेत. जिल्ह्यात १ हजार ९४० मतदान केंदे्र असून २३३ झोनमध्ये त्यांची विभागणी केली आहे. निवडणूक प्रक्रि या सुव्यवस्थितपणे व्हावी याकरिता जिल्ह्यात १२ हजार ८०४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होणार आहे. तसेच मतमोजणी २३ फेब्रुवारी २०१७ रोजी होईल. निवडणूकमुक्त व निर्भय वातावरणात होण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-२०१७साठी मंगळवार, २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होणार आहे. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्या क्षेत्रांतील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान दिनी मंगळवार, २१ फेब्रुवारी २०१७ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे व आठवडा बाजारदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ११८ जागाअलिबाग : निवडणुकीच्या रणांगणावरील प्रचाराचा धुरळा रविवारी खाली बसल्यानंतर आता मंगळवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८३, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३७४, असे एकूण ५५७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. मतदान शांततेत आणि निर्भीड वातावरणात पार पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. २३ फेब्रुवारीला सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अलिबाग तालुक्यातील थळ मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार मानसी दळवी आणि शेकापच्या चित्रा पाटील यांच्यामध्ये लढत आहे. शहापूर मतदार संघातील शेकापच्या सुश्रूषा पाटील विरुद्ध उज्ज्वला पाटील यांच्या लढतीकडे सर्वांचेचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे आदिती तटकरे राजकीय नशीब आजमावत असल्याने रोहे तालुक्यातील वरसे मतदार संघामध्येही प्रतिष्ठेची लढत आहे. आदिती यांच्याविरोधात भाजपाच्या श्रद्धा घाग या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आदिती या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. २१ फेब्रुवारीला मतदान पार पडल्यानंतर २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मतपेट्या उघडल्यानंतरच जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे. हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर सर्वाधिक उमेदवार निवडून आलेला पक्ष सत्तास्थापनेचा दावा करू शकणार आहे. यामुळे मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.चोख पोलीस बंदोबस्तच्कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी ८, पोलीस निरीक्षक २२, सहायक पोलीस निरीक्षक/ पोलीस सब इन्स्पेक्टर १५४, पोलीस कर्मचारी १९९०, होमगार्ड ५५०, राज्य राखीव दल पोलीस पथक-१, शीघ्रकृती दल पथक-१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी एकूण पाच निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 12,804कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी करण्यात आली आहे. मतदान मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होणार आहे. मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात होण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.