पनवेल महापालिका मुख्यालयाच्या पायरीवर महिलेची प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:24 AM2019-09-22T00:24:44+5:302019-09-22T00:26:19+5:30

माता-बाळ दोघेही सुखरूप; रुग्णालयात उपचार सुरू

Female childbirth at the foot of Panvel Municipal Headquarters | पनवेल महापालिका मुख्यालयाच्या पायरीवर महिलेची प्रसूती

पनवेल महापालिका मुख्यालयाच्या पायरीवर महिलेची प्रसूती

Next

पनवेल : पनवेल महानगरपालिका मुख्यालयाच्या पायरीवर एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना शनिवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास घडली. अनिला समीर ठाक (२२) असे या महिलेचे नाव आहे.

प्रसूतीच्या वेदना होत असल्याने अनिला जिल्हा रुग्णालयात येण्यास निघाल्या. दरम्यान, ज्या रिक्षाने त्या उपजिल्हा रुग्णालयात येण्यास निघाल्या त्या रिक्षा चालकाला पालिका रुग्णालयात रिक्षा घेऊन चला असे या ठाक दाम्पत्याने सांगितले. रिक्षाचालकाला देखील याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने रिक्षाचालकाने रिक्षा थेट पालिका मुख्यालयाजवळ आणला. दरम्यान, मुख्यालयात उतरताच क्षणी पायऱ्यांवर चढताना अनिला ठाक यांच्या प्रसूती वेदना तीव्र झाल्याने काही क्षणातच अनिलाने पायरीवरच एका मुलीला जन्म दिला. मुख्यालयातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला माहिती दिली. मात्र रुग्णवाहिकेतील वाहनचालक जागेवर नसल्याचे समजले. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत माहिती मिळताच डॉक्टर व परिचारिकेने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, डॉक्टरांनी त्वरित जन्मलेल्या बाळाची नाळ कापून आई व बाळाला रुग्णालयात हलविण्यास सांगितले. यावेळी पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जीवन कोंडिलकर यांनी त्वरित गाडीने नवजात मुलीला रुग्णालयात दाखल केले.

आम्ही त्वरित माता व बाळावर प्राथमिक उपचार सुरू केले आहेत. दोघांची प्रकृ ती उत्तम आहे.
- डॉ. नागनाथ यम्पल्ले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पनवेल

शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू केली. मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिका मुख्यालयात ही रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होवू शकली नाही. वाहनचालकच नसल्याने हा प्रकार घडल्याने संबंधित वाहनचालकावर कारवाईची मागणी केली जात आहे.

Web Title: Female childbirth at the foot of Panvel Municipal Headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.