- वैभव गायकर पनवेल : पनवेल रेल्वे स्टेशनवर 21 रोजी सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी महिलेने महिला अर्भकाला जन्म दिल्याची घटना घडली. प्रसूती झालेली महिला व बाळ दोन्हीही सुखरूप आहेत. संबंधित महिलेचे नाव मनीषा असून, पनवेल ते नेरुळ प्रवासादरम्यान महिलेला प्रसूती वेदना झाल्यावर ती खांदेश्वर रेल्वे स्टेशनवर उतरली. यावेळी डॉक्टरकडे जाण्यासाठी पुन्हा खांदेश्वर ते पनवेल दरम्यान प्रवास करत असताना मोठ्या प्रमाणात वेदना झाल्यावर रेल्वे स्टेशनवरील स्टेशनमास्तर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या एक रुपये क्लीनिक उपक्रमाचे डॉ. विशाल वाणी यांनी महिला व नवजात बालकाची तपासणी केल्यावर दोन्हीही सुखरूप असल्याचे सांगितले. पनवेलचे स्टेशन मास्तर एस. एम. नायर यांनीदेखील दोघेही सुखरूप असल्याची माहिती दिली.
पनवेल रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसूती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:43 AM