महिला रिक्षाचालकांना वाशीत हवी स्वतंत्र रांग
By admin | Published: January 22, 2017 03:14 AM2017-01-22T03:14:15+5:302017-01-22T03:14:15+5:30
वाशी रेल्वे स्टेशनसमोर महिला रिक्षाचालकांना व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका मिळावी, अशी मागणी लकी रिक्षा टॅक्सीचालक-मालक वेल्फेअर असोसिएशनने
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशनसमोर महिला रिक्षाचालकांना व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका मिळावी, अशी मागणी लकी रिक्षा टॅक्सीचालक-मालक वेल्फेअर असोसिएशनने केली आहे. स्टेशन समोर महिलांना योग्य वागणूक मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईमध्ये महिला रिक्षाचालकांची संख्या वाढू लागली आहे. परिस्थितीवर मात करून महिला व्यवसाय करत असून त्यांना काही ठिकाणी अपमानजनक वागणूक मिळत आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोर काही उद्धट रिक्षाचालक त्यांना योग्य वागणूक देत नसल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्याकडे करण्यात आली आहे. महिला रिक्षाचालकांना वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र जागा दिली जावी, अशी विनंती केली आहे; परंतु येथे व्यवसाय करणारे चालक त्यांना स्वतंत्र जागा देण्यास तयार नाहीत. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाशीमध्ये रिक्षाचालक म्हणून काम करणाऱ्या सपना लक्ष्मण लोखंडे, नीलांबरी कोटकर, रमा मुकुंद कसबे, सुमन नलावडे, आर. एम. मुलानी, विद्या राठोड, संगीता टाकळकर, सुनीता रांजणे, रेश्मा चिकणे, सावित्री डोंगरे यांनी सह्यांचे निवेदन दिले आहे.