शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

बडीशेपचे दरही घसरले! जिरे-मोहरीची फोडणी झाली स्वस्त; हळदीलाही आले सोन्याचे दिवस

By नामदेव मोरे | Published: April 17, 2024 8:48 AM

गतवर्षभरामध्ये मसाल्याच्या दरांमध्ये सातत्याने तेजी होत होती.

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उन्हाळ्यामध्ये वर्षभराचा चटणी मसाला, लोंची, पापड बनविण्याची तयारी करणाऱ्या गृहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर महागाईचा तडका बसलेले जिरे, मोहरीचे दर कमी झाले आहेत. यामुळे आता घरातील जेवणासह, लग्नसराईतील जेवणावळीसाठीची फोडणी स्वस्त झाली आहे.      गतवर्षभरामध्ये मसाल्याच्या दरांमध्ये सातत्याने तेजी होत होती. जिरे, मोहरीसह इतर मसाल्यांचे दरही प्रचंड वाढले होते. यामुळे गृहिणींनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करण्यासाठी हात आखडता घेतला होता. उन्हाळ्यामध्ये वर्षभराचा चटणी मसाला, लोंची, पापड केले जातात. लग्नसराईसह इतर समारंभातील फोडणीच्या मसाल्यांमध्ये जिरे, मोहरीला महत्त्वाचे स्थान असते. एक महिन्यापासून या दोन्ही मसाल्यांचे दर घसरले आहेत.

मार्चमध्ये २६५ ते ४१० रुपये किलो दराने विकले जाणाऱ्या जिऱ्याचे दर आता २०२ ते २८० रुपयांवर आले आहेत. मोहरीचे दर ५५ ते ८० वरून ५५ ते ६५ रुपये किलो झाले आहेत. बडीशेपचे दर १५० ते २८५ रुपये किलोवरून ११० ते १७० रुपयांवर आले आहेत. एक वर्षानंतर दरामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- जिरे व मोहरीचे दर कमी झाले असले तरी हळदीच्या दरामध्ये तेजी आहे. गतवर्षी हळदीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी हळदीला समाधानकारक दर मिळत आहेत.

- बाजार समितीमध्ये मार्चमध्ये हळदीला १५० ते २०० रुपये किलो दर मिळत होता. आता ते १६० ते २२० रुपयांवर गेले आहेत. 

बाजार समितीमधील मसाल्याचे दर  मसाल्याचे नाव    मार्च    एप्रिल 

  • जिरे    २६५ ते ४१०    २०२ ते २८०
  • मोहरी    ५० ते ८०    ५५ ते ६५
  • लवंग    ६०० ते १५००    ७०० ते ९००
  • बडीशेप    १५० ते २८५    ११० ते १७०
  • चिंच    ७० ते ११५    ७५ ते १३०
  • धने    ७५ ते १६०    ९० ते १७०
  • हळद    १५० ते २००    १६० ते २२०
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई