न्याय हक्कासाठी अपंगाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:34 AM2017-12-05T02:34:45+5:302017-12-05T02:34:47+5:30
पदवीधर प्रकल्पग्रस्त अपंगाला जेएनपीटीने १९९८ पासून आश्वासन देवूनही आजतागायत नोकरीवर सामावून घेण्यास दिरंगाई चालविली आहे. जेएनपीटीने चालविलेल्या अन्यायाविरोधात अपंग जेएनपीटी प्रकल्पग्रस्त दिलीप घरत
उरण : पदवीधर प्रकल्पग्रस्त अपंगाला जेएनपीटीने १९९८ पासून आश्वासन देवूनही आजतागायत नोकरीवर सामावून घेण्यास दिरंगाई चालविली आहे. जेएनपीटीने चालविलेल्या अन्यायाविरोधात अपंग जेएनपीटी प्रकल्पग्रस्त दिलीप घरत यांनी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून उपोषणाला सुरुवात केली आहे.नवीन शेवा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जे. पी. म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जगजीवन भोईर, ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले
आहेत.
जेएनपीटीने बंदरासाठी जमिनी संपादन करताना घरटी एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर पदवीधर प्रकल्पग्रस्त असलेले दिलीप धनाजी घरत यांनाही १९९८ पासून २०१७ दरम्यान कामावर घेण्यासाठी फक्त आश्वासनेच दिली आहेत. तसेच न्याय मागणीसाठी याआधीही उपोषणही केले आहे. नोकरीत सामावून घेण्याच्या लेखी आश्वासननंतरच त्यावेळी उपोषण मागे घेण्यात आले होते.
मात्र त्यानंतरही आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही. १९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला नसल्याच्या निषेधार्थ धनाजी घरत या पदवीधर अपंगाने न्याय हक्कासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.
जागतिक अपंग दिनाच्या दिवशीच जेएनपीटी प्रशासन भवनासमोरच सुरू केलेल्या दिलीप घरत यांच्या उपोषणाला उरण परिसरातूनही वाढता पाठिंबा मिळत आहे.
जेएनपीटीविरोधात उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती खालावली
उरण : जेएनपीटी बंदरअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरातील नोकरभरती आणि मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी या मागणीकरिता रविवारपासून जेएनपीटीविरोधात पाणजे गावातील महिलांनी सुरू केलेल्या काही उपोषणकर्त्यांची प्रकृ तीखालावत चालली आहेत.
तिसºया दिवशी रामीबाई पाटील (५८) यांना जेएनपीटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे त्या अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या तालुका अध्यक्ष कलावती भोईर यांचीही प्रकृती खालावत आहे. त्या चक्कर येवून पडल्याने आणि शुगर वाढल्याने सोमवारी क ोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोलीचे वैद्यकीय अधिकाºयांनी न्हावा शेवा बंदर पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांसमक्ष कलावती भोईर व त्यांच्या समवेत असलेल्या १६ महिला उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली असल्याची माहिती न्हावा शेवा बंदर पोलीस ठाण्यातून देण्यात आली. उपोषणकर्त्यांची जेएनपीटी अधिकाºयांनी अद्यापही दखल घेतली नसल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.