उरणमधील १७ प्रकल्पग्रस्त महिलांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:54 AM2018-08-29T04:54:13+5:302018-08-29T04:54:39+5:30
उरण तालुक्यातील १७ प्रकल्पग्रस्त महिलांंना जेएनपीटीच्या चौथ्या बंदराअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) प्रशासनाने नोकरी नाकारल्याने त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
उरण : उरण तालुक्यातील १७ प्रकल्पग्रस्त महिलांंना जेएनपीटीच्या चौथ्या बंदराअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) प्रशासनाने नोकरी नाकारल्याने त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. गुणवत्ता यादीत पात्र ठरूनही केवळ महिला असल्याने आपल्याला डावलण्यात येत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त महिलांनी केला असून, न्याय्य हक्कासाठी मंगळवारपासून दि. बा. पाटील चौक करळ फाटा येथे उपोषणाला सुरु वात केली आहे.
जेएनपीटी बंदराच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी)च्या बंदरातील व्यवस्थापनाने नोकरभरतीपासून १७ प्रकल्पग्रस्त महिलांना वंचित ठेवले आहे. त्यांच्या सोबत परीक्षार्थी म्हणून असलेल्या इतर सुमारे १२५ उमेदवारांना कंपनीतर्फे कामावर रु जू करून घेण्यात आले आहे. महिलांच्या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक, कामगार संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. उपोषणात सोनल म्हात्रे (फुंडे), श्रुती तांडेल (करळ), रूपाली घरत (नवीन शेवा), अंकिता घरत (म्हातवली), प्रियांका कोळी (हनुमान कोळीवाडा), कविता कोळी (हनुमान कोळीवाडा), श्रुती ठाकूर (जसखार), श्रद्धा भोईर (नवघर), शिल्पा घरत (नवीन शेवा), विद्या ठाकूर (जसखार), रंजना भोईर (नवीन शेवा) श्रद्धा नाईक (जासई), दीपिका पाटील (जसखार), कांचन म्हात्रे (फुंडे), प्रणाली पाटील (बोकडविरा), रंजना भोईर, समीक्षा पाटील आदी महिलांंचा समावेश आहे.