पाचगणीत फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:02 AM2018-05-13T06:02:05+5:302018-05-13T06:02:05+5:30

वयाची चाळीशी ओलांडलेल्या खेळाडूंच्या फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेला महाबळेश्वर येथील पाचगणीमध्ये शनिवारपासून सुरुवात झाली

Fifty Futures Plus Cricket Tournament Thunder | पाचगणीत फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचा थरार

पाचगणीत फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचा थरार

googlenewsNext

नवी मुंबई : वयाची चाळीशी ओलांडलेल्या खेळाडूंच्या फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेला महाबळेश्वर येथील पाचगणीमध्ये शनिवारपासून सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेसाठी शहरी व ग्रामीण भागातील शेकडो क्रि केटप्रेमी दोन दिवसआधी पाचगणीत दाखल झाले आहेत. त्यामुळे या परिसरात क्रि केटमय वातावरण निर्माण झाले आहे. १४ वर्षांपूर्वी तुर्भे येथील प्रदीप पाटील यांनी ४० वर्षांवरील खेळाडूंचे आरोग्य सुदृढ राहावे, याकरिता फोर्टी प्लस क्रिकेट क्लबची स्थापना केली. आज या क्लबमध्ये सुमारे १२०० खेळाडू रोज सराव करून क्रि केट खेळण्याचा आनंद घेत आहेत.
नवी मुंबईतील चाळीशी ओलांडलेल्या ग्रामस्थ व शहरी भागातील खेळाडूंची फोर्टी प्लस ही क्रिकेट स्पर्धा दरवर्षी मे महिन्यात महाबळेश्वर येथील पाचगणीमध्ये भरविण्यात येते. यंदा स्पर्धेचे हे १२वे वर्ष आहे. या स्पर्धेत ग्रामीण भागातील ३२ आणि शहरी भागातील १४ असे एकूण ४६ संघ सहभागी झाले आहेत. त्यानिमित्ताने नवी मुंबईतील सुमारे १२०० क्रि केट खेळाडू आपले कौशल्य दाखवणार आहेत. या स्पर्धा पाचगणीतील संजीवनी हायस्कूलच्या मैदानात आयोजित केल्या आहेत.
शनिवारी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण संघाचे बक्षीस समारंभ १३ मे तर शहरी संघाचा बक्षीस समारंभ १४ मे रोजी सायंकाळी संपन्न होणार आहे. या स्पर्धेत नवी मुंबईतील प्रत्येक गावातील एक किंवा दोन क्रि केट संघ सहभागी झाले आहेत. आपल्या विभागातील क्रि केट खेळाडूंना प्रोत्साहित देण्यासाठी शेकडो नवी मुंबईकर पाचगणीत दाखल झाले आहेत. फोर्टी प्लस क्रिकेट क्लबचे अध्यक्ष प्रदीप काशिनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पाचगणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर, नगरसेवक प्रवीण दोदे, माजी उपनगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, संजीवनी हायस्कूलचे मुख्याध्यापक रवींद्र देशमुख यांची साथ लाभली आहे. स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंसाठी निवास व भोजनाची व्यवस्था फोर्टी प्लस क्रि केट क्लबच्या वतीने करण्यात आली.

Web Title: Fifty Futures Plus Cricket Tournament Thunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.