पार्किंगसाठी नवी मुंबईत मारामाऱ्या आणि खून...; वाहन उभे करण्यावरून सतत भांडणे, पार्किंग करायची कुठे?

By नामदेव मोरे | Published: January 5, 2024 12:04 PM2024-01-05T12:04:23+5:302024-01-05T12:05:26+5:30

रेल्वे स्थानके वगळता कुठेच वाहनतळाची सोय नसल्यामुळे ही वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगच्या प्रश्नावरून भांडणे वाढली असून ती मारामारीपासून खून करण्यापर्यंत विकोपाला गेली आहेत.

Fights and murders in Navi Mumbai for parking Constant fight over parking, where to park\ | पार्किंगसाठी नवी मुंबईत मारामाऱ्या आणि खून...; वाहन उभे करण्यावरून सतत भांडणे, पार्किंग करायची कुठे?

पार्किंगसाठी नवी मुंबईत मारामाऱ्या आणि खून...; वाहन उभे करण्यावरून सतत भांडणे, पार्किंग करायची कुठे?

नवी मुंबई : सुनियोजित नवी मुंबईमध्ये पुरेशा वाहनतळांची निर्मिती करण्यास सिडकोसह महापालिकेला विसर पडला आहे. शहरातील नोंदीत वाहनांची संख्या पाच लाख ६२ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. रेल्वे स्थानके वगळता कुठेच वाहनतळाची सोय नसल्यामुळे ही वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगच्या प्रश्नावरून भांडणे वाढली असून ती मारामारीपासून खून करण्यापर्यंत विकोपाला गेली आहेत.

नवी मुंबईमधील तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये ८ ऑगस्टला पार्किंगवरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. ऑक्टोबरमध्ये नेरूळमध्ये पार्किंगच्या वादातून एकास मारहाण झाली होती. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वाहने उभी करण्यावरून अशा प्रकारची भांडणे रोज होत आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाचे नियोजनच केले जात नाही. यामुळे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात असून पार्किंगचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.

शहरात साडेपाच लाखांहून अधिक वाहने
- दहा वर्षांपूर्वी शहरातील वाहनांची संख्या तीन लाख एक हजार ७३१ एवढी होती. दहा वर्षांत ही संख्या तब्बल पाच लाख ६२ हजार ८९१ झाली आहे.
- शहरातील निवासी बांधकामांची संख्या दाेन लाख ६३ हजार आहे. याचाच अर्थ प्रत्येक कुटुंबामागे सरासरी दोनपेक्षा जास्त वाहने शहरात आहेत. 
- ही वाहने उभी करण्यासाठी सिडकोने व महानगरपालिकेने पुरेशा वाहनतळांची निर्मिती केलेलीच नाही.
- रेल्वे स्थानक वगळता इतर ठिकाणी वाहनतळच नाहीत. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. अनेक ठिकाणी पदपथांवरही वाहने उभी करावी लागत आहेत. 
- एपीएमसी परिसरात रोडवर दोन रांगेत वाहने उभी केली जात असून वाहतुकीसाठी एकच लेन मिळत आहे. 
- सानपाडा, इंदिरानगर, एपीएमसीमधील जोड रस्त्यांचा वापरही पार्किंगप्रमाणे करावा लागत असून वाहनतळाचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान पोलिस, सिडको व महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे.

महानगरपालिकेमध्ये प्रत्येक विभागात वाहनतळ विकसित करण्यासाठीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सीबीडीमध्ये वाहनतळाचे काम पूर्ण झाले असून शहराची पार्किंग पॉलिसी 
तयार करण्याचे काम सुरू आहे.
-राजेश नार्वेकर, आयुक्त, महानगरपालिका

महानगरपालिकेच्या सोबत पार्किंगचे नियोजन करण्यासाठीच्या बैठका सुरू आहेत. वाहनतळांचे नियोजन केले जात असून अवजड वाहनांसाठी पुरेशा वाहनतळांची गरज आहे.
- तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त वाहतूक

वर्षनिहाय वाढलेल्या वाहनांची संख्या
वर्ष     नोंदीत वाहने
२०१४    २९,९२७
२०१५    ३८,५९४
२०१६     ४५,७११
२०१७     ४१,६८७
२०१८     ४१,९०१
२०१९     ४३,०४५
२०२०     ३६,४६०
२०२१     २४,३५१
२०२२     ६१,७८६
२०२३     ३७,६८९

नवी मुंबईमधील वाहनांची संख्या
वाहन प्रकार     २०१३-१४         २०२२-२३
दुचाकी         १,४०,०७२        २,९३,८८८
कार             ८९,३६०         १,३९,६३३
जीप             ४,०७३        ४,०७०
स्टेशन वॅगन    ५७०         ५६९ 
मीटर टॅक्सी     ८५            ७३५ 
टुरिस्ट टॅक्सी     ७,६६५        १६,७३४
रिक्षा         १२,०९१        ३५,४७०
स्टेज कॅरिजेस    ६९            ३४१ 
कॉन्टॅक्ट कॅरिजेस - ३,१४७        ३,७४१
स्कूल बस             ६५६     १,०१५
प्रा. स. व्हे.     २८५         ३६२ 
रुग्णवाहिका    २६६         ३५६ 
ट्रक             १२,६२३        १७,२७९
टँकर         ४,४८३         ५,४६६
डिलिव्हरी व्हॅन     १८,६८७         ३२,८८७
ट्रॅक्टर         ३३             ५९ 
ट्रेलर्स         ३,४०२         ३,१०७
इतर         ४,१६४         ४,२५८
एकूण         ३,०१,७३१        ५,६२,८९१
 

Web Title: Fights and murders in Navi Mumbai for parking Constant fight over parking, where to park\

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.