पनवेल : पनवेलमधील स्टँडवरून दोन रिक्षा संघटना आपापसात भिडल्याने, दोन्ही संघटनांचे पाच पदाधिकारी जखमी झाले आहेत. मंगळवारी इको चालकांनी नव्या स्टँडचे उद्घाटन ठेवल होते. या उद्घाटना वेळी मिनीडोअर रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टँडला विरोध दर्शवला. या वेळी निर्माण झालेल्या वादातून दोन्ही संघटनेचे पदाधिकारी जखमी झाले आहेत.प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्फत इको रिक्षांना परवाना वाटप करण्यात आले आहेत. ज्यांना हे परवाने प्राप्त झाले आहेत. त्यांनी नवीन इको वाहन खरेदी केली आहेत. याकरिता अनेकांनी बँकेतून लोन काढले आहे. तर अनेकांनी सोने तारण ठेवत इको वाहन खरेदी केली आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय व पनवेल महानगरपालिकेशी समन्वय साधून, पनवेल आयटीआयजवळ स्टँडदेखील मिळवले आहे. मात्र, याच ठिकाणी अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत असलेल्या मिनीडोअर चालकांनी या स्टँडला विरोध दर्शवत, या ठिकाणी व्यवसाय करू देणार नसल्याचे सज्जड दमच या इकोचालकांना दिले. मात्र, मिनीडोअर चालकांच्या विरोधाला न जुमानता, सोमवारी इकोचालकांनी या स्टँडच्या उद्घाटनाचा कार्यक्र म ठेवला. या स्टँडला विरोध करण्यासाठी आलेल्या मिनीडोअर चालक व इको चालकांमध्ये या वेळी वाद निर्माण झाला. त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही संघटनांचे पदाधिकारी स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत, त्यामुळे स्थानिकांची नेमकी व्याख्या तरी काय आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.इकोचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अधिकृतरीत्या स्टँड उपलब्ध करून दिले असल्यामुळे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पनवेल शहर पोलिसांनी दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांवर गुन्हे दाखल केले आहेत.इको वाहनचालकांनी रीतसर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घेतली असल्याने, त्यांना या ठिकाणी व्यवसाय करण्यास कोणाची हरकत असू नये. मिनीडोअर चालकही त्यांच्याकडे स्टँडची परवानगी असल्याचे सांगत आहेत. तशाप्रकारचे कागदपत्र त्यांनी वाहतूक पोलिसांना दाखवावेत. त्यानंतर आम्ही यासंदर्भात निर्णय घेऊ.- विजय कादबानेवरिष्ठ पोलीस निरीक्षक,पनवेल वाहतूक शाखाइको वाहनचालकांना रीतसर स्टँड उपलब्ध करून दिले असल्यामुळे ते त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतात. विशेष म्हणजे, पालिका क्षेत्रात मिनीडोअर चालकांना व्यवसाय करता येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्फत लादलेल्या नियमांचे उलंघन करणाºया संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- हेमांगिनी पाटील,प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल
रिक्षाचालकांच्या दोन गटांत मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 2:59 AM