महापौरपदासाठी आज अर्ज दाखल होणार; सर्वपक्षीय नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 06:43 AM2017-11-03T06:43:42+5:302017-11-03T06:44:06+5:30

महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. शुक्रवार, ३ तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार असून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीमध्ये दगाफटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने समर्थकांसह सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.

To file nomination for Mayor post; All party councilors leave for unknown places | महापौरपदासाठी आज अर्ज दाखल होणार; सर्वपक्षीय नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

महापौरपदासाठी आज अर्ज दाखल होणार; सर्वपक्षीय नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

Next

नवी मुंबई : महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. शुक्रवार, ३ तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार असून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीमध्ये दगाफटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने समर्थकांसह सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.
नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची सत्ता कायम राहणार की, शिवसेना भगवा फडकविणार, याविषयी उत्सुकता शहरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत उमदेवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिवसेनेच्या वतीने विरोधी पक्षनेते विजय चौगुले उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीने उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. डॉ. जयाजी नाथ, जे. डी. सुतार, विनोद म्हात्रे यांची नावे आघाडीवर आहेत; परंतु गणेश नाईक चर्चेतील नावांना बगल देऊन आयत्या वेळी नवीन चेहरा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलेला उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामध्ये सलुजा सुतार यांचे नाव आघाडीवर आहे.
महापौरपदासाठी शिवसेना व राष्ट्रवादीने दावा केला असून, उपमहापौरपदासाठी काँगे्रसच्या वतीने अर्ज दाखल केला जाणार आहे. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांचे नाव निश्चीत समजले जात आहे; परंतु शिवसेनेच्या वतीने काँगे्रसला महापौरपद देण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे नक्की काय होणार? हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांची मते फोडण्याची रणनीती आखली आहे. दगाफटका बसू नये, यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीने त्यांचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना केले आहेत.

आजी-माजी पालकमंत्र्यांची कसोटी
महापालिकेची सत्ता टिकविण्यासाठी माजी पालकमंत्री गणेश नाईक स्वत: लक्ष देत आहेत.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार नाही यासाठी दक्षता घेतली जात आहे. काँगे्रसबरोबर आघाडी टिकविण्यासाठीही व अपक्षांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडून काँगे्रस व अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आजी-माजी पालकमंत्र्यांची कसोटी लागली असून नक्की बाजी कोण मारणार, हे ९ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष
सर्वांचे लक्ष शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रससह अपक्षांच्या भूमिकेकडे लागले आहे. भाजपाच्या सहा नगरसेवकांना महत्त्व दिले जात असून, त्यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शुक्रवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लढतीचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

Web Title: To file nomination for Mayor post; All party councilors leave for unknown places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.