ऐरोलीतील महापालिकेच्या सेल्फी पॉइंटची तोडफोड केल्याने गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 12:24 AM2021-03-24T00:24:58+5:302021-03-24T00:25:19+5:30

पालिकेच्या वतीने ऐरोली येथील फ्लेमिंगो पार्कच्या समोरच मोकळ्या जागेत हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. त्यामुळे परिसराची शोभा वाढली होती

Filed a case of vandalism of a municipal selfie point in Airoli | ऐरोलीतील महापालिकेच्या सेल्फी पॉइंटची तोडफोड केल्याने गुन्हा दाखल

ऐरोलीतील महापालिकेच्या सेल्फी पॉइंटची तोडफोड केल्याने गुन्हा दाखल

Next

नवी मुंबई : दिवाळे गाव येथे पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटची तोडफोड करण्यात आली आहे. लाखो रुपये खर्चून पालिकेने हे शिल्प उभारले होते. मात्र तोडफोड करण्यामागे राजकीय उद्देशांचा संशय व्यक्त होत आहे. 

पालिकेच्या वतीने ऐरोली येथील फ्लेमिंगो पार्कच्या समोरच मोकळ्या जागेत हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. त्यामुळे परिसराची शोभा वाढली होती. तर परिसरात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांकडून या सेल्फी पॉइंटला पसंदीदेखील मिळत होती. याच उद्देशाने पालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी असे सेल्फी पॉइंट बनविण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी दिवाळे येथील सेल्फी पॉइंटची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. तिथले पक्के बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले आहे. यामुळे एखाद्या वाहनाच्या मदतीने ही तोडफोड करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Filed a case of vandalism of a municipal selfie point in Airoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.