तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनमधून बाहेर पडणा-या रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणा-या केंद्रातील संचालक मंडळावर तळोजा पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल केला आहे.तळोजा एमआयडीसीत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) अनेक वर्षांपासून सांडपाण्यावर प्रक्रियाच केली जात नसल्याचे उघड झाले आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले. सीईटीपीतील कर्मचारी दोषी आढळल्याने केंद्रातील संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला. प्रदूषण मंडळावरही कारवाई करणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. पर्यावरण मंत्र्यांनी गुरुवारी केलेल्या पाहणी दौºयात सीईटीपीचा भोंगळ कारभार दिसून आल्याने त्याच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
सीईटीपीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल; कासाडी नदी प्रदूषण प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 4:26 AM