शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

मोरबे धरण परिसराच्या सौंदर्यीकरणात पडणार भर; एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 4:24 AM

वृक्षारोपणामुळे मोरबे धरण परिसरात हरितपट्टा निर्माण होईल व सौंदर्यीकरणात भर पडेल असा विश्वास महापौर सुतार यांनी यावेळी व्यक्त केला.

नवी मुंबई : पर्यावरणाचे संवर्धन या भूमिकेतून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण व संवर्धनावर भर दिला जात असून मोरबे धरण परिसरात महापालिका आणि शासनाचा सामाजिक वनीकरण विभाग यांच्या माध्यमातून १ लाखाहून अधिक वृक्षारोपण केले जात आहे. या वनमहोत्सवाचा शुभारंभ बुधवार ३ जुलै रोजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते पार पडला. या भव्य वृक्षारोपणामुळे मोरबे धरण परिसरात हरितपट्टा निर्माण होईल व सौंदर्यीकरणात भर पडेल असा विश्वास महापौर सुतार यांनी यावेळी व्यक्त केला.सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने ही १ लाख ५ हजार इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि त्या वृक्षरोपांचे ३0 महिने संवर्धन करण्यात येणार असून यामुळे धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढेल तसेच जमिनीची धूप थांबेल व त्यामुळे धरणात जाणारा गाळ कमी होऊन धरणाची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे हा संपूर्ण परिसर हरित होऊन येथील निसर्गरम्यता वाढीस लागून वातावरणात प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. मोरबे धरण परिसरात ४२ हेक्टर क्षेत्रफळावर वड, पिंपळ, उंबर, चिंच, आवळा, मोह, खैर, शिसम, अर्जुन, बेल, कडुनिंब, कैलासपती, बहावा, आंबा अशा विविध भारतीय प्रजातींच्या वृक्षरोपांचा समावेश आहे. या १ लाख ५ हजार वृक्ष लागवडीच्या माध्यमातून मोरबे धरण परिसरात पशुपक्षी, फुलपाखरे, कीटक यांचा अधिवास वाढेल आणि परिसराची जैवविविधता वृद्धिंगत होणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने या वृक्षलागवडीसाठी व संवर्धनासाठी साधारणता ९ कोटी २८ लाखाहून अधिक खर्च केला जाणार असून या वृक्षारोपणामुळे मोरबे धरण परिसराचे नैसर्गिक मूल्य वाढणार आहे.मोरबे येथे संपन्न झालेल्या वनमहोत्सवाप्रसंगी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी महापौर सुधाकर सोनवणे, उद्यान विभागाचे उप आयुक्त नितीन काळे, सामाजिक वनीकरण रायगड येथील विभागीय वन अधिकारी अप्पासाहेब निकत, सुधागड पालीचे वनक्षेत्रपाल आय.डी.जळगावकर, सहाय्यक संचालक आर.एम.म्हात्रे आदी मान्यवर नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेचे अधिकारी,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वर्षी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या संकल्पित ३३ कोटी वृक्षारोपणातील १ लाख ५ हजार वृक्षांचे वृक्षारोपण मोरबे धरण प्रकल्प परिसरात होत आहे. मागीलवर्षी याठिकाणी महापालिकेने १0 हजार ५00 झाडे लावलेली असून यावर्षी १ लाखापेक्षा अधिक झाडे लावण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग रायगड यांच्या मागणीनुसार मोरबे धरण परिसरात वृक्षारोपण होत आहे. वृक्षारोपणामधून या परिसराचे पर्यावरणदृष्ट्या महत्त्व वाढणार आहे.- डॉ. रामास्वामी एन., महापालिका आयुक्त

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई