नैसर्गिक पावसाळी नाल्यात भराव

By admin | Published: June 8, 2015 04:07 AM2015-06-08T04:07:29+5:302015-06-08T04:07:29+5:30

धानसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसविण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भवानी नगर (धरणा कॅम्प) या गावालगत सोळा एकर जमिनीवर भराव करण्यात आला आहे.

Filling in natural rainy gutters | नैसर्गिक पावसाळी नाल्यात भराव

नैसर्गिक पावसाळी नाल्यात भराव

Next

कळंबोली : धानसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसविण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भवानी नगर (धरणा कॅम्प) या गावालगत सोळा एकर जमिनीवर भराव करण्यात आला आहे. यामुळे येथील नैसर्गिक नाल्याला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात कॅम्पमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर या भरावाबाबत प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.
१९६१ मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करंजावडे गावातून कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे स्थानिक मंडळी बाधित झाली. शासनाने त्यातील काही कुटुंबांचे पुनर्वसन पनवेल तालुक्यातील रोहिंजण गावालगत केले. प्रकल्पग्रस्तांनी या ठिकाणी स्थलांतर केले. पुनर्वसनाच्या यातना, हालअपेष्टा सोसत असताना आता काहीशी ही मंडळी स्थिरावली. मात्र त्यांच्यावर पुराचे संकट घोंघावत आहे. भवानी नगर म्हणून ओळखलेल्या धरणा कॅम्पलगत सोळा एकर जमीन आहे. त्या ठिकाणी मोठमोठी गोदामे बांधण्याचे काम संबंधित व्यावसायिकाने हाती घेतले आहे. त्याकरिता त्याने या जमिनीवर सात ते आठ फूट भराव केला. त्यामुळे या ठिकाणी उंचवटा झाला असून गाव खाली राहिले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी भवानी नगरमध्ये घुसण्याची शक्यता गडद झाली आहे.
पावसाळ्यात गावातील पावसाचे पाणी या नाल्यातून वाहून जात असे. त्यामुळे कुठेही पाणी साचत नव्हते. मात्र संबंधितांनी हा नाला मनमानी करून अडवला. गोदाम मालकाने दमदाटी करून गावकऱ्यांचा आवाज दडपत भराव केला. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी गावातच साचून दलदल, दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढला असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पावसाळी पाण्याचा निचरा करणारा किंवा पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्रोताला बाधा आणणे किंवा त्या नाल्यावर भराव करणे, त्याला अडवणे किंवा बुजवणे ही बाब आपत्ती व्यवस्थापनाला बाधा आणणारी असल्याने संबंधितावर कारवाई होऊ शकते. ग्रामविकास मंडळाने या संदर्भात गृह, पर्यावरण मंत्र्यांबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पनवेलचे प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे तक्र ार केली आहे.(वार्ताहर)

गावठण जागेत अतिक्रमण
च्भवानी नगर(धरणा कॅम्प) जवळ मोठ्या प्रमाणात गोदाम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते अधिकृत आहेत की अनधिकृत याची चाचपणी शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत नाही. मात्र त्याचा त्रास येथील गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
च्अनेक वर्षांपूर्वी नैसर्गिक नाला गोदामवाल्यांनी बंद केला आहेच. त्याचबरोबर कोणताही सर्व्हे न करता गावठाणामधील जागेत अतिक्र मण त्यांनी केले आहे. परिसरात रबर, टायर व टाकाऊ वस्तू दररोज जाळत असल्याने विषारी धूर व दुर्गंधी पसरत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून भाताचे पीक सुध्दा निघत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Filling in natural rainy gutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.