शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

खारघरमध्ये बंडखोरांच्या मनधरणीत अखेर भाजपाला आले यश

By admin | Published: May 12, 2017 1:59 AM

पनवेल महापालिका निवडणुकीत खारघर शहरात ३ प्रभागात १२ जागेसाठी निवडणुका होणार आहेत. तिकीट न मिळाल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीत खारघर शहरात ३ प्रभागात १२ जागेसाठी निवडणुका होणार आहेत. तिकीट न मिळाल्याने सर्वच पक्षातील इच्छुकांनी बंडखोरीचा रस्ता अवलंबला. यात भाजपाच्या बंडखोरांची संख्या मोठी होती. त्यांनी खारघर विकास आघाडी या स्वतंत्र पक्षाचीही स्थापना केली होती. या आघाडीद्वारे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय भाजपामधील बंडखोरांनी घेतला होता. मात्र भाजपा वरिष्ठ नेत्यांनी या आघाडीच्या सदस्यांशी चर्चा करीत बंडखोरांना थोपवण्यात यश मिळवले आहे. गुरुवार, ११ मे रोजी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला १२ ही जागांवर विकास आघाडीच्या उमेदवारांनी भरलेले अर्ज मागे घेतले आहेत. बुधवार, १0 मे रोजी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये रात्री उशिरा झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खारघर विकास आघाडीमध्ये काही इच्छुक उमेदवारांमध्ये राजेंद्र ऊर्फ मामा मांजरेकर, विजय पाटील, अजय माळी, संतोष शर्मा या उमेदवारांचा समावेश होता. ११ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. तर खारघर प्रभाग ६ मधून शेकापच्या उमेदवार मंजुळा संतोष तांबोळी यांनी देखील शेकापविरोधात भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. खारघरमध्ये आयोजित बैठकीवेळी रामशेठ ठाकूर यांच्यासह वाय. टी. देशमुख, शंकर ठाकूर, दत्ता वर्तेकर, शत्रुघ्न काकडे आदी उपस्थित होते.