अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या

By नारायण जाधव | Published: September 13, 2022 12:05 PM2022-09-13T12:05:24+5:302022-09-13T12:06:57+5:30

या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते.

Finally that 14 villages in Navi Mumbai Municipal Corporation; The government asked for objections and suggestions | अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या

अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या

Next

नवी मुंबई - महाराष्ट्र शासनाने अखेर ठाणे आणि कल्याणच्या वेशीवरील ती १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून, महापालिकेची पूर्व-पश्चिम व दक्षिणोत्तर हद्द निश्चितीसंदर्भातील आदेश सोमवारी रात्री उशिराने काढले आहेत. या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करून त्या संदर्भातील हरकती व सूचना एका महिन्याच्या आत शासनाने मागविल्या आहेत. शासनाने काढलेल्या या आदेशानंतर १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने आनंद व्यक्त केला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकींवर बहिष्कार
या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. त्यानंतर रात्री ती महापालिकेत समाविष्ट करण्याचे आदेश निघाले.

ही आहेत ती १४ गावे -
दहिसर, मोरी, निघू, वाकळण, नावाळी, भंडार्ली, बाळे, बामार्लि, गोठेघर, उत्तरशिव, पिंपरी, नारीवली, नागाव यांचा यात समावेश आहे.

पूर्वी ही गावे होती महापालिकेत -
ही गावे १९९५ साली ही नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होती. येथून दोन नगरसेवक निवडून आले होते. येथे रस्ते, गटारे, पायवाटा. माता बाल रुग्णालय नवी मुंबई महापालिकेने बांधले होते. मात्र मालमत्ताकर वाढीवरून ती बाहेर पडली होती.

Web Title: Finally that 14 villages in Navi Mumbai Municipal Corporation; The government asked for objections and suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.