अभिनेत्री केतकी चितळे विरोधात 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा; फेसबुक पोस्ट भोवली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 11:18 AM2020-03-03T11:18:47+5:302020-03-03T12:48:53+5:30
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई - आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते स्वप्निल गोविंद जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार केतकी चितळे हिच्यावर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
केतकीने 1 मार्च रोजी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये 'नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो' असं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टवर काही जणांनी आक्षेप घेतला आहे.
'ब्राह्मण द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की 'मुसलमान, ख्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू' असं ही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय' असं ही केतकीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोदींनी सोशल मीडिया सोडू नये, अन्यथा...; संजय राऊत यांचा खोचक टोला
Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार
भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण