नवी मुंबईतील 'त्या' मंडळावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 11:39 AM2019-09-14T11:39:52+5:302019-09-14T11:43:57+5:30

विसर्जन मिरवणूक वेळी मूर्तीची प्रभावळ विद्युत वायरीला लागून चौघांना शॉक लागल्याची घटना घडली होती.

fir registered against raje shivchhatrapati ganeshotsav mandal in navi mumbai | नवी मुंबईतील 'त्या' मंडळावर गुन्हा दाखल 

नवी मुंबईतील 'त्या' मंडळावर गुन्हा दाखल 

Next

नवी मुंबई - विसर्जन मिरवणूक वेळी मूर्तीची प्रभावळ विद्युत वायरीला लागून चौघांना शॉक लागल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सिवूड येथील राजे शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (12  सप्टेंबर) रात्री नेरूळ येथे ही दुर्घटना घडली होती. 

मंडळातर्फे 15 फुट मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. या मूर्तीचे गुरुवारी रात्री मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून विसर्जन केले जात होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून ट्रॉली खेचली जात होती. त्यानुसार नेरूळ येथील पुलाच्या उताराला काही वेळासाठी विसर्जन थांबवण्यात आले होते. यावेळी उतार असल्याने ट्रॉली पुढे सरकल्याने मूर्तीच्या प्रभावळचा वरचा भाग उपरी विद्युत वायरीला टेकला. त्यामुळे मूर्ती मधून विद्युत प्रवाह वाहून चौघांना शॉक लागला होता. सुदैवाने वायरीला प्रभावळ टेकताच स्पार्क होऊन मुख्य विद्युत प्रवाह खंडित झाला होता, त्यामुळे चौघांना आर्थिंगचा झटका बसला होता. मंडळाकडून विसर्जनावेळी झालेल्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. त्यानुसार सेक्टर 46/48 येथील राजे शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ (सिवूडचा महाराजा) या मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी संगितले आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर इतरही मंडळांना गणपती मंडळाच्या मूर्तीच्या उंचीवर मर्यादा लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: fir registered against raje shivchhatrapati ganeshotsav mandal in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.